सिद्धिविनायकाच्या महाप्रसादात उंदीर असल्याचा व्हिडिओ व्हायरल:ट्रस्ट करणार चौकशी, अध्यक्ष म्हणतात हे साफ खोटे
आंध्र प्रदेशातील तिरुमला बालाजी मंदिराच्या प्रसादात चरबीयुक्त तूप वापरल्याचा आरोप होत आहे. त्यातच आता मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिरातील प्रसादासाठी लाडवांच्या पाकिटावर उंदीर फिरत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे येथील प्रसादाच्या गुणवत्तेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हा व्हिडिओ सिद्धिविनायक मंदिरातीलच अाहे का, याची पुष्टी अजून कुणीही केलेली नाही. या प्रकाराची चौकशी करण्याच्या सूचना सिद्धिविनायक ट्रस्टच्या सचिव वीणा पाटील यांनी दिल्या आहेत. तसेच मंदिरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासणार असल्याचे त्या म्हणाल्या. मंदिरातील व्हिडिओ नाही, हे कुणाचे तरी षड्यंत्र व्हायरल व्हिडिओ सिद्धिविनायक मंदिरातील नाही. हे कुणाचे तरी षड्यंत्र आहे. तो व्हिडिओ कधीचा आहे, कुठला आहे, हे काहीही समजत नाही. फक्त प्लास्टिकमध्ये बंद काहीतरी असल्याचे दिसत आहे. – सदा सरवणकर, अध्यक्ष, सिद्धिविनायक मंदिर समिती