अमित आणि जुई यांनी दिलेल्या मुलाखतीत अमितने जुई २४ फेब्रुवारी रोजी लग्न करणार असल्याचं सांगितलं. तर त्यावर त्याला सुधारत स्वतः जुईने आपण ४ फेब्रुवारी रोजी आपलं संपूर्ण आयुष्य कुणालातरी देणार आहोत असं म्हटलं होतं. मात्र आता तिने यावर स्पष्टीकरण दिलं आहे. याबद्दल बोलताना जुई म्हणते, ‘योगायोग असा की माझ्या चारही मालिका ‘ पुढचं पाऊल’, ‘वर्तुळ’, ‘सरस्वती’ आणि ‘ठरलं तर मग’ या वेगवेगळ्या वर्षी २४ फेब्रुवारी रोजीच प्रदर्शित झालेल्या. त्यामुळे अमित तेव्हा मस्तीमध्ये २४ फेब्रुवारी म्हणाला आणि तो व्हिडिओ व्हायरल झाला. पण मी लग्न करत नाहीये. माझा तसा काहीच प्लॅन नाहीये. मी सध्या माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित करतेय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लग्न करण्यासाठी याआधी मला मुलगा तर मिळायला हवा.’ असं म्हणत जुईने या सगळ्या अफवा असल्याचं स्पष्ट केलं आहे.
जुईने ‘श्रीमंत बाजीराव पेशवा मस्तानी’, ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ आणि ‘तुजविण सख्या रे’ या मालिकांमध्ये काम केलं आहे. मात्र तिला ‘पुढचं पाऊल’ या मालिकेतून खरी लोकप्रियता मिळाली. आता जुई सायली बनून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय.