विराट कोहलीने विश्वचषकात उत्कृष्ट फलंदाजी केली आहे. विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे. विराट कोहलीने या विश्वचषकात ७६५ धावा केल्या होत्या. विराट कोहली टीम इंडियासाठी सतत धावा करत आहे. मात्र या फलंदाजाचा स्ट्राइक रेट चांगला नाही, अशा चर्चा निर्माण होत होत्या.
विश्वचषक फायनलमध्ये जडेजाला यादवच्या आधी का पाठवलं? मोठं कारण आलं समोर, वाचा सविस्तर…
मात्र आता जेतेपदाच्या लढतीत विराट कोहलीने आपल्या टीकाकारांना उत्तर दिले आहे. मिचेल स्टार्क ऑस्ट्रेलियासाठी डावातील ७वे षटक टाकण्यासाठी आला. मिचेल स्टार्कच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या बॉलवर विराट कोहलीने सलग चौकार मारले. अशा प्रकारे मिचेल स्टार्कच्या पहिल्या ३ बॉलवर विराट कोहलीने १२ धावा केल्या. मात्र, विराट कोहलीने मिचेल स्टार्कला सलग ३ चौकार मारून माजी भारतीय कर्णधाराच्या स्ट्राईक रेटवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.

विराट कोहलीने रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम सामन्यात ४० धावांचा टप्पा ओलांडून २०२३ मध्ये एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) मध्ये १५०० धावा पूर्ण केल्या आहेत. दरम्यान रोहित शर्मा ४७ धावांवर बाद झाल्यानंतर सर्वांच्या नजरा विराट कोहलीकडे लागल्या होत्या. पण तोही ५४ धावांवर बाद झाला. या धावसंख्येवर विराट कोहली बाद होणे कोणालाच आवडले नाही. विराट बाद झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
बीडच्या आजीची संपूर्ण देशभरात चर्चा, भारतानं विश्वचषक जिंकावा म्हणून पहाटेपासून करत आहेत…
दरम्यान कांगारूंचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाला ५० षटकांत २४० धावा करता आल्या. भारताकडून विराट कोहली आणि केएल राहुलने अर्धशतके झळकावली. पण याशिवाय बाकीच्या फलंदाजांनी निराशा केली. ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कने सर्वाधिक ३ बळी घेतले. याशिवाय जोश हेझलवूड आणि पॅट कमिन्सने २-२ विकेट घेतल्या. तर अॅडम झाम्पाला १ यश मिळाले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *