मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा दौरा टळला:मोर्शी बसस्थानकाचा कार्यारंभही रद्द
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अमरावती दौरा आज, रविवारी अचानक रद्द झाला. दौरा रद्द झाल्याने मोर्शी येथील नव्या एस.टी. बसस्थानकाचा कार्यारंभही रद्द करण्यात आला आहे. आमदार रवि राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टीच्यावतीने आयोजित दहिहंडी स्पर्धेसाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री अमरावतीत येणार होते. दरम्यान त्यांच्या उपस्थितीचा लाभ घेत एसटी महामंडळाच्या मोर्शी बसस्थानकाचा कार्यारंभही केला जाणार होता. एसटी महामंडळाने हा कार्यक्रम दुपारी ४ वाजता आयोजित केला होता. परंतु दोन्ही मंत्र्यांचे दौरे ऐनवेळी रद्द झाल्याने हा कार्यक्रमही अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्याचे विभाग नियंत्रक नीलेश बेलसरे यांनी सांगितले. मुख्यमंत्री-लाडकी बहिण योजनेच्या विदर्भातील शुभारंभाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजीत पवार शनिवारी गोंदिया व नागपुर येथे उपस्थित होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर तिघांनीही नागपुरात मुक्काम केला. त्यामुळे दुसऱ्या दिवशी ते अमरावती जिल्ह्यात येतील, याची दाट शक्यता होती. परंतु तसे झाले नाही. त्यामुळे राणा यांच्या दहिहंडीला केवळ सिनेसृष्टीतील अभिनेत्यांची उपस्थिती होती. फडणवीस पहिल्यांदा अनुपस्थित आमदार रवि राणा व माजी खासदार नवनीत राणा यांनी आयोजित केलेल्या दहिहंडीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेल्या काही वर्षात सतत उपस्थित राहिले आहेत. एवढेच काय तर भाजपच्या नेत्यांना माहित न होऊ देताही ते या कार्यक्रमाला आल्याची उदाहरणे आहेत. मात्र यावर्षी ते पहिल्यांदा अनुपस्थित राहिले. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चा केल्या जात होत्या.