शरीर निरोगी ठेवण्यासाठी आणि चांगले कार्य करण्यासाठी सर्व प्रकारची जीवनसत्त्वे आवश्यक असतात. जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे शरीरात आरोग्याच्या अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. असे एक आवश्यक पोषक म्हणजे व्हिटॅमिन बी 6, ज्याला पायरिडॉक्सिन (pyridoxine) असे देखील म्हणतात. हे पाण्यात विरघळणारे जीवनसत्व आहे, जे आपल्या शरीराला अनेक कार्यांसाठी आवश्यक असते. प्रोटिन, फॅट आणि कर्बोदकांमधील चयापचय लाल रक्तपेशी आणि न्यूरोट्रांसमीटरच्या निर्मितीसाठी हे आवश्यक आहे.

या पोषक तत्वाच्या कमतरतेमुळे तुम्हाला त्वचेवर पुरळ उठणे, ओठ फुटणे, घसा सुजणे, रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होणे, थकवा येणे, हात-पाय दुखणे, चक्कर येणे अशा अनेक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तुमचे शरीर व्हिटॅमिन बी 6 तयार करू शकत नाही, म्हणून तुम्हाला ते पदार्थ किंवा सप्लीमेंट्समधून मिळवणे आवश्यक आहे. व्हिटॅमिन बी 6 ची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही कोणत्या गोष्टींचे सेवन केले पाहिजे ते जाणून घेऊया.

गाजर

एका रिपोर्टनुसार, गाजरात व्हिटॅमिन बी 6 मुबलक प्रमाणात आढळते. ही भाजी व्हिटॅमिन सी, ए, लोह, फायबर यासह इतर अनेक पोषक तत्वांचे भांडार आहे. गाजरामध्ये एक ग्लास दुधापेक्षा जास्त व्हिटॅमिन बी 6 असते. याव्यतिरिक्त, गाजर हे फायबर आणि व्हिटॅमिन ‘ए’ चा एक उत्तम स्रोत आहे.

(वाचा :- World Hepatitis Day : लिव्हर साफ व मजबूत ठेवून हेपेटायटिसपासून वाचण्यासाठी ताबडतोब खायला घ्या हे 4 पदार्थ..!)

दूध

दूध हे केवळ कॅल्शियमचाच उत्तम स्रोत नाही तर ते व्हिटॅमिन बी 6 चे भांडार देखील आहे. दररोज दुधाचे सेवन केल्याने हाडे आणि स्नायू मजबूत होण्यास मदत होते आणि पचनाच्या समस्या टाळता येतात.

(वाचा :- Head Neck Cancer symptoms : धोक्याची घंटा, ‘ही’ 6 लक्षणं दिसल्यास सावधान..! असू शकतो मान किंवा डोक्याचा कॅन्सर)

केळ

जर तुम्हाला वजन वाढवायचे असेल तर तुमच्यासाठी केळी हा उत्तम पर्याय आहे. व्हिटॅमिन बी 6 व्यतिरिक्त केळी विविध अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर देखील शरीराला प्रदान करते.

(वाचा :- पोट, कंबर व मांड्यांवरची चरबी मेणासारखी वितळेल, ‘या’ 5 गोष्टींचे कॉम्बिनेशन फॉलो करा, जिम व डाएटला मारा गोळी.!)

पालक

या हिरव्या पालेभाजीमध्ये लोह, फोलेट आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. अशक्तपणा आणि कमकुवत हाडांनी त्रस्त असलेल्यांनी त्यांचा आहारात समावेश करावा.

(वाचा :- मंकीपॉक्सचं रौद्ररूप, स्त्री व पुरूषांच्या प्रायव्हेट पार्ट्सना करतोय टार्गेट, या 3 लक्षणांवर ठेवा बारीक नजर.!)

चिकन, लिव्हर किंवा कलेजी

व्हिटॅमिन बी 6 ची कमतरता पूर्ण करण्यासाठी, आपण नियमितपणे चिकन लिव्हरचे सेवन केले पाहिजे. व्हिटॅमिन बी 6 व्यतिरिक्त हे फोलेट आणि आयर्नचा देखील चांगला स्रोत आहे. याच्या सेवनाने शरीराला अनेक फायदे मिळतात.

(वाचा :- ब्लड प्रेशरच्या रूग्णांसाठी गुड न्युज, फक्त खा ‘हे’ 5 पदार्थ, रक्तवाहिन्या खुल्या होऊन 100 च्या स्पीडने धावेल रक्त)

टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.