मुंबई- आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारा लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता राम कपूर सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. राम आणि त्याची पत्नी गौतमी कपूर सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच आपल्या चाहत्यांसोबत जोडलेले असतात. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी ते नेटकऱ्यांसोबत शेअर करत असतात. आताही त्यांच्या आयुष्यातील एक गोड बातमी त्यांनी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. राम आणि गौतमी यांनी नुकतीच एक लक्झेरियस फरारी गाडी खरेदी केली आहे. आपल्या चमचमत्या लाल रंगाच्या फरारीचा फोटो त्यांनी चाहत्यांसोबत शेअर केला आहे. त्यांचा गाडीसोबतचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.


राम आणि गौतमी यांनी लाल रंगाची इटालियन ४ सीटर कन्व्हर्टिबल ग्रँड-टूरर फरारी विकत घेतली आहे. ही गाडी तिच्या स्पोर्ट्स लेगिसीसाठी ओळखली जाते. या गाडीची किंमत तब्बल ३ कोटी ५० लाखांच्या घरात आहे. या गाडीचे फोटो सध्या नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय बनले आहेत. नेटकऱ्यांनी त्यांच्यावर लाइक आणि शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. राम आणि गौतमी कायमच चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. ते नेहमीच त्यांचे प्रॅन्क व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असतात. सोबतच त्यांच्या मुलांचे आणि कुत्र्यासोबतचे फोटोही नेटकऱ्यांसोबत शेअर करत असतात.


यापूर्वी राम आणि गौतमी यांनी अलिबाग येथे खरेदी केलेल्या घरामुळे ते सोशल मीडियावर चर्चेत होते. त्यांनी अलिबाग येथे अत्यंत प्रशस्त असा बंगला खरेदी केला आहे. या बंगल्याचे फोटोही चाहत्यांमध्ये व्हायरल झाले होते. ते दोघेही सुट्ट्या घालवण्यासाठी तिथे जात असतात. राम आणि गौतमी ‘घर एक मंदिर’ या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांनी २००३ साली लग्नगाठ बांधली. त्यांना सिया नावाची मुलगी आणि अक्ष नावाचा मुलगा आहे. रामने १९९७ साली प्रदर्शित झालेल्या ‘न्याय’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. तो ‘बडे अच्छे लगते हैं’ या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झाला होता. सध्या राम अनेक चित्रपट आणि वेबसीरिजमध्ये काम करताना दिसत आहे.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *