हिमवृष्टीची प्रतीक्षा वाढली;नैनिताल अन् मसुरी 30 वर्षांनंतर जानेवारीत सर्वात उष्ण:उत्तराखंडच्या पर्वतांवर कडक ऊन, तर पठारांवर धुक्यामुळे हुडहुडी
उत्तराखंडमध्ये हवामान विचित्र रंग दाखवत आहे. हिमवृष्टीच्या प्रतीक्षेतील पर्यटनस्थळे नैनिताल, मसुरी, गड मुक्तेश्वर, अलमोडा आदी शहरांत उकाडा जाणवत आहे. स्थिती ही आहे की, नैनितालमध्ये ३० वर्षांनंतर जानेवारी महिन्याचे सरासरी तापमान १९.५ अंश राहिले. ते सरासरी १४ अंश इतके असते. शुक्रवारीही नैनितालमध्ये पारा १९ अंश होता. ६ जानेवारीला कमाल तापमान २४ अंशांपर्यंत होते. यापूर्वी १९९५ च्या जानेवारीत कमाल तापमान २३.२ अंश नोंदवले होते. याउलट मैदानांमध्ये धुक्यामुळे पर्वतांवर एप्रिल-मेसारखी उष्णता जाणवत आहे. नैनितालची आर्यभट्ट विज्ञान संशोधन संस्था एरीजचे वरिष्ठ शास्त्रज्ञ नरेंद्र सिंग म्हणाले, कोरड्या हवामानात आर्द्रता घटल्याने तापमान वाढले. पश्चिमेकडील वारे आर्द्रता कमी करत असल्याने उष्णता वाढली.
मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात तीन दिवस ढगाळ वातावरण नाशिक| कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तीन दिवस ढगाळ वातावरण राहणार अाहे. तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज नागपूर वेधशाळेने वर्तवला आहे. विदर्भात ५ दिवस हवामान कोरडे राहील. राज्यात तीन दिवसांपासून थंडी वाढली असून शुक्रवारी (१० जानेवारी) धुळे येथे नीचांकी ६.०, निफाड येथे ७.८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली. पाऊस… पुन्हा भिजू शकतात पाच राज्ये पंजाब, हरियाणा, दिल्ली-एनसीआर, पूर्व राजस्थान, उत्तर मध्य प्रदेशातील अनेक भागांत शनिवारी चांगल्या पावसाचा अंदाज आहे. पुढील दोन दिवस अनेक राज्यांत रात्रीचे तापमानही वाढेल. १३ जानेवारीपासून राजस्थान-गुजरातसह उत्तर भारतात तापमान पुन्हा घसरेल. उत्तर भारतात पुन्हा दाट धुके राहण्याची शक्यता आहे. हवामानातील बदलामुळे पर्यटक चकित, थंडीऐवजी लोक घामाघूम जम्मूपेक्षा जास्त हिमवृष्टी उत्तराखंडमध्ये शक्य : हवामान विभागाने शुक्रवारी सांगितले की, पश्चिमी विक्षाेभ पर्वतांवर पोहोचला. पर्वतांवर पुढील दोन दिवस हिमवृष्टीची शक्यता आहे. यामुळे लडाख, जम्मू-काश्मिरातील उंच पर्वतांवर हलकी हिमवृष्टी होईल, तर उत्तराखंड व हिमाचलात जम्मू-काश्मीरपेक्षा जास्त हिमवृष्टीची शक्यता आहे.