असा बनवा आपला बाप्पा:घरच्या घरी गणेशमूर्ती तयार करण्यासाठी पाहा VIDEO, स्टेप बाय स्टेप
विघ्नहर्ता गणपती बाप्पाच्या आगमनाला आता अवघे काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. सगळीकडे जल्लोष व आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. बाप्पाच्या आगमनासाठी भाविक व भक्तगण आतुर झाले आहेत. बाप्पाच्या आगमनाकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. आज दीपशिखा फाऊंडेशनच्या मनिषा चौधरी यांच्याकडून जाणून घेऊया घरच्या घरी गणपती बनवण्याची सोप्पी पद्धत. ‘दिव्य मराठी डिजिटल’ने मनिषा चौधरी यांचा मातीचा गणपती बनवतानाचा एक खास व्हिडिओ शूट केलाय. पूर्वीच्या काळी नदीकाठची माती आणून त्याचा बाप्पा घडवला जात होता. आता नद्या दुर्लभ झाल्या आहेत. आणि गेले काही वर्ष पर्यावरणाचे संपूर्ण संतुलन बिघडले आहे. पर्यावरणाचे संवर्धन करणेही गरजेचे झालेले आहे. शाडू माती ही सुद्धा पूर्णपणे पर्यावरण पूरक नाही. शाडू माती ही अत्यंत बारीक असून ती कुठे टाकली असता मातीचा भुसभुशीतपणा संपतो आणि झाडांच्या मुळाशी पाणी मिळत नाही व हवा खेळत नाही. त्यामुळे झाडाची वाढ खुंटते, कधीकधी तर झाड मरते सुद्धा. त्याचबरोबर विहिरी-तलावामध्ये जर ही माती गेली तर त्याचा गाळ काढणे खूप कठीण होऊन बसते. म्हणूनच शाडू माती ही पूर्णपणे पर्यावरण पूरक नाही. त्याचा पुनर्वापर होत नसल्यामुळे प्रदूषण होते. त्यातुलनेत मातीच्या गणपती मूर्तींना अधिक पारंपरिक आणि पर्यावरणपूरक पर्याय मानला जातो. माती नैसर्गिकरित्या पाण्यात सहज विरघळते आणि विसर्जनानंतर जलाशयातील मातीच्या मूर्ती लवकरच नष्ट होतात. यामुळे जलाशयांमध्ये प्रदूषणाची समस्या कमी होते आणि जलचरांच्या जीवनावरही प्रतिकूल परिणाम होत नाही. पीओपी मूर्तींना आकर्षक रंग आणि विविध आकार देणे सोपे असते, म्हणूनच त्या मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाल्या आहेत, तथापि पीओपी मूर्तींना त्याच वेळी काही गंभीर पर्यावरणीय समस्या निर्माण होतात. पीओपी ही एक प्रकारची जिप्सम आहे, जी पाण्यात सहजपणे विरघळत नाही. त्यामुळे विसर्जन केल्यानंतरही मूर्तीचे अवशेष पाण्यात राहतात. यामुळे पाण्याची गुणवत्ता खालावते आणि जलचरांच्या जीवनावर प्रतिकूल परिणाम होतो. हे प्रदूषण टाळण्यासाठी आपला बाप्पा फक्त हा मातीचाच असावा. म्हणून घरचीच माती घेऊन घरच्या घरी गणपती करणे आणि त्याचे घरीच विसर्जन करणे हा संकल्प घेऊन दीपशिखा फाउंडेशनने यावर्षी ‘बाप्पा माझा फक्त मातीचा’ हा नवा उपक्रम सुरु केला आहे. मनिषा चौधरी यांनी या उपक्रमाबाबत सांगितले की, यावर्षी पासून मी फक्त मातीच्याच गणपती बनवण्याच्या कार्यशाळा घेत आहे. शाडु मातीला पूर्णपणे बॅन केले आहे. यामुळे कमी प्रतिसाद मिळेल असे वाटले होते. मात्र या उपक्रमालाही छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिशय उत्तम असा प्रतिसाद मिळत आहे. गणपती बनवण्याआधी माती कशी बनवावी याच्या कार्यशाळा घेतल्या. माती बनवण्याची प्रक्रिया 1. मोठे भांडे भरून कुठलीही माती घ्या
2. ही माती अर्ध्या पाण्याच्या बादलीत टाका
3. संपूर्ण माती पाण्यात ढवळून काढा
4. वर आलेला काडीकचरा काढून टाका
5. मातीचे मिश्रण पिठाच्या चाळणीतून गाळून घ्या.
6. चाळणीतला वरचा कचरा फेकून द्या आणि खालचे पाणी तसेच राहू द्या
7. पाच तासानंतर वरवरचे पाणी फेकून द्यायचे आणि खालची माती पसरवून सुकवा.
8. हळूहळू माती सुकून एक दोन दिवसांमध्ये पोळीच्या कणकेसारखी होईल. जी माती हाताला चिटकतही नाही आणि सहज आकारात वळू शकते
9. आता ही तयार झालेली माती एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीत बंद करून किंवा डब्यात बंद करून ठेवा जेणेकरून ती सुकणार नाही. गणपती बाप्पाचे वाहन उंदिर, असे बनवा पाहा VIDEO बाप्पाला रंग कसा द्यावा, VIDEO 15 वर्षांपासून उपक्रम मनिषा चौधरी या 15 वर्षांपासून गणपती बनवण्याच्या मोफत कार्यशाळा घेतात. पर्यावरण संवर्धन, जतन यासाठी आपण काहीतरी करायला हवे या विचारातून या कल्पनेने त्यांच्या मनात जन्म घेतला. सुरुवातील त्या गणपती बनवणाऱ्या मूर्तीकाराकडे गेल्या. मात्र कार्यशाळा घेण्यासाठी त्या मूर्तीकाराने सांगितलेली रकम ऐकून त्यांचा धक्का बसला. मग त्या स्वतः गणपती बनवायला शिकल्या. आणि शाडु मातीचे गणपती शिकवायला त्यांनी सुरुवात केली. शाळा, महाविद्यालय, सामाजिक संस्था, कार्यालय अशा प्रत्येक ठिकाणी त्यांनी मोफत कार्यशाळा घेतल्या. मात्र यावर्षीपासून त्यांनी शाडु मातीऐवजी घरातल्या मातीचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. शाडु मातीही पूर्णपणे पर्यावरणपुरक नाही यादृष्टीने त्यांनी हे मोठे पाऊल उचलले आहे. स्वतंत्र गणेशोत्सव नकोच असे ठरवले 15 वर्षांपूर्वी शाडू मातीचे गणपती बनवायला आणि सोबतच शिकवायला मनिषा यांनी सुरुवात केली. दिव्य मराठी डिजिटलशी बोलताना त्या म्हणाल्या, दरवर्षी होणाऱ्या कार्यशाळांमधून शेकडो गणपती माझ्या हातून बनतात. ते बाप्पा लोकांच्या घरी विराजमान होतात. आणि तेव्हापासून माझे कार्य हीच माझी भक्ती झाली. माझा गणेशोत्सव माझा न राहता सगळ्यांचाच झाला. सुंदर अनुभवांची पोतडी आपल्या अनोख्या गणेशोत्सवाविषयी पुढे त्या म्हणाल्या, ‘ जेव्हा मी स्वत: हाताने गणपती बनवू लागले. तेव्हा इतरांनी देखील असेच पर्यावरणपूरक बाप्पा आपल्या घरी बसवावे यासाठी कार्यशाळा घेण्यास सुरुवात केली.आणि बघता बघता या उपक्रमाला 15 वर्षे झालीत.एकदा एका मंदिरात गणपती बनवण्याची कार्यशाळा सुरू होती. त्यावेळी अचानक एक आजी माझ्याजवळ आल्या आणि खूप मायेने माझ्या डोक्यावरुन हात फिरवत त्या म्हणाल्या ‘गुणाची माझी लेक गं, किती छान काम करतेस, किती मोठे सत्कार्य तुझ्या हातून घडत आहे तेही निशुल्क. त्यावेळी खरोखर खूप छान वाटले आणि त्याचवर्षी ठरवले आपण शिकवलेले, आकार दिलेले सगळ्यांचे गणपती तेच माझे गणपती. तो गुळाचा गणपती कायम आठवणीत राहिल एकदा एक कार्यशाळा आटोपून मी घरी निघाले होते. त्यावेळी एक आजी माझ्या दिशेने आल्या. त्यांच्या हातात गुळाचा गणपती होता. मग मी त्यांना ओळखल की या आपल्या कालच्या कार्यशाळेत आल्या होत्या. त्या मला म्हणाल्या , मी तुम्हाला काल गणपती बनवताना पाहिले आणि माझी गणपती बनवण्याची इच्छा अनावर झाली. घरात दुसरं काहिच नसल्यामुळे मी गुळाचा गणपती बनवला. हा अनुभव माझ्यातल्या कलाकाराला फार सुखावून गेला. सामाजिक ऐक्याचा संदेश दीपशिखा फाऊंडेशनद्वारे 17 ऑगस्टला शहरातील शिशुविहार शाळेत मातीचा बाप्पा बनवण्याची कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेमध्ये 90 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला. कार्यशाळेमध्ये फाउंडेशन तर्फे पहिला व द्वितीय क्रमांक काढण्यात आला. यात अल्फिया शेख, झीनत खान विद्यार्थीनींनी बक्षिस पटकावले. त्यासोबतच धर्म-जात विसरुन गुण्यागोविंदाने राहणाऱ्या भारतीय संस्कृतीच्या एकात्मतेचा संदेशही या दोघी विद्यार्थीनींनी दिला. अल्फिया आणि झीनत यांनी शाळेतील कार्यशाळेत सहभाग घेत सुबक अशी बाप्पाची मुर्ती मनोभावे घडवली. आणि ही मुर्ती त्यांच्या शिक्षिका आता आपल्या घरी स्थापन करणार आहेत.