नवी दिल्लीः मुंबईत पाऊस कधी येईल, याचा नेम नाही. जर तुम्हाला घराबाहेर पडण्याआधी कळाले की, पाऊस कधी पडणार आहे. तर बऱ्याच गोष्टी सोप्या होतील. तसेच तुमची धावपळ सुद्धा होणार नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमध्ये नेहमी Weather Apps ठेवणे गरजेचे आहे. आपल्या फोनमध्ये हे ॲप असेल तर तुम्हाला पाऊस कधी येणार आहे, याचा अलर्ट कळू शकणार आहे. प्ले स्टोरवर तुम्हाला याप्रकारचे अनेक ॲप मिळतील. जाणून घ्या Best Weather Apps संबंधी.

अँड्रॉयडवर मिळणारे टॉप 3 Weather Apps
Weather- Live & Forecast: हे ॲप अँड्रॉयडवर उपलब्ध आहे. याला ५ पैकी ४.७ स्टार दिले आहेत. तर १ लाखांहून जास्त डाउनलोड्स मिळालेले आहेत. यात तुम्हाला दररोज हवामान कसे राहिल यापासून ते एअर क्वॉलिटी पर्यंत सर्व माहिती मिळेल. याला तुम्ही फ्री मध्ये डाउनलोड करू शकतात.

Weather Apps- Weather Live:
याला तुम्ही प्ले स्टोरवरून डाउनलोड करू शकतात. याला प्ले स्टोरवर ४.६ रेटिंग दिली आहे. या ॲपला ५० लाखांहून जास्त डाउनलोड केले आहे. हे ॲप तुम्हाला रियल टाइम वेदर रडार देते. सोबत लोकल आणि नॅशनल वेदरची माहिती देते. प्रत्येक तासाचे हवामान कसे राहील, याची माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळू शकते.

Weather & Radar India: याला ४.२ रेटिंग दिली आहे. याला ५ कोटीहून जास्त डाउनलोड्स मिळालेले आहेत. यात वेदर लाइव्ह रेडार मॅप्स, मॉन्सून रेन फोरकास्ट, फार्म वेदर, ७ ते १४ दिवसासाठी लोकल वेदर फोरकास्ट सारखे फीचर्स दिले आहेत. तुम्ही या ॲपला फ्री मध्ये डाउनलोड करू शकतात. प्रत्येक दिवसाच्या हवामानाची माहिती तुम्ही घरी बसून मिळवू शकतात. हे गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध आहे.

वाचाः जोरदार ऑफर्ससह Flipkart-Amazon सेलमधून १० हजारांपेक्षा कमीमध्ये घरी आणा ‘हे’ स्मार्टफोन्स

वाचाः Airtel चा पैसा वसूल प्लान ! एका महिन्याच्या रिचार्जमध्ये ९० दिवस Free OTT सब्सक्रिप्शन, पाहा किंमतSource link

Leave a Reply

Your email address will not be published.