पश्चिम महाराष्ट्रात जनतेचा दिग्गजांना धक्का:विकासाचा मुद्दा उचलल्याने अजित पवारांना बारामतीकरांचा कौल!

पश्चिम महाराष्ट्रात जनतेचा दिग्गजांना धक्का:विकासाचा मुद्दा उचलल्याने अजित पवारांना बारामतीकरांचा कौल!

पश्चिम महाराष्ट्र हा शरद पवार यांचा गड मानला जात होता. राष्ट्रवादीला २०१९ मध्ये प. महाराष्ट्रात २२ जागा मिळाल्या होत्या, आता राज्यात केवळ १० जागा मिळाल्या आहेत. शरद पवारांचा बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात मतदारांनी आघाडीला मोठा धक्का देत महायुतीच्या बाजूने काैल दिला. संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचेे युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार या लढतीत अजित पवार यांनी १ लाख मतांच्या फरकाने विजय मिळवला. दरम्यान, अजित पवारांनी बारातमीत विकासकामे केल्याने त्यांना यश मिळाले. महायुतीला पश्चिम महाराष्ट्रात ५८ जागांपैकी ४४ जागांवर विजय मिळाला आहे, तर महाविकास आघाडीला १० आिण इतर ४ अशा जागा मिळाल्या आहेत. कराड दक्षिणमधून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पुण्यात कसबा पेठमधील रवींद्र धंगेकर यांचा पराभव काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. तासगाव – कवठे महाकाळमधून आर.आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील विजयी झाले अाहेत. लाडक्या बहिणींनी सरकारला तारले लाडकी बहीण योजना महायुती सरकारला तारणारी ठरली. सरकारने या कॅम्पेनची चांगली प्रसिद्धी केल्याने याचा मोठा फरक दिसून आला. आघाडीतील मतभेदांचा मोठा फटका बसला महायुतीने आपले उमेदवार जाहीर केल्यानंतरही महाआघाडी मात्र उमेदवार चाचपण्यात व्यग्र होती. आघाडीतील बिघाडीचा फटका बसला. दिग्गज पराभूत ‘एक हैं तो सेफ हैं’ या घोषणेमुळे पश्चिम महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी मतांचे एकत्रीकरण झाले आणि यंदा मोठा बदल दिसून आला.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment