मुंबई : बाजारात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, पण स्वत:साठी योग्य गुंतवणुकीचा पर्याय निवडणेही खूप महत्त्वाचे आहे. मार्केट लिंक्ड डिबेंचर (Market Linked Debentures) देखील बाजारात अशाच प्रकारच्या गुंतवणुकीसाठी उपलब्ध आहेत. मार्केट लिंक्ड डिबेंचर्स काय आहेत आणि त्याचे फायदे काय आहेत याविषयी आपण माहिती घेऊ.

या मल्टीबॅगर स्टॉकने १४ सप्टेंबर २०२२ रोजी वर्षभरात नवीन मूल्यनोंद केली
मार्केट लिंक्ड डिबेंचर (MLD) म्हणजे काय?
मार्केट लिंक्ड डिबेंचर (Market Linked Debentures) हे अपरिवर्तनीय कर्जरोखे आहेत. एमएलडीमध्ये निश्चित परतावा उपलब्ध नाही. त्याचा परतावा अंतर्निहित निर्देशांकाच्या म्हणजेच इक्विटी, सरकारी उत्पन्न, सुवर्ण निर्देशांक यांच्या कामगिरीवर आधारित असतो. मार्केट लिंक्ड डिबेंचर सेबी (SEBI) द्वारे नियंत्रित केले जातात.

टाटा समूहाचा सुपरहिट शेअर; फक्त ६ दिवसात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट
मार्केट लिंक्ड डिबेंचर (MLD) ची वैशिष्ट्ये

 • १३ महिन्यांपासून ते ६० महिन्यांपर्यंतच्या इश्यू उपलब्ध
 • MLDs डेट गुंतवणुकीच्या श्रेणीत येतात
 • कॅपिटल प्रोटेक्शनमध्ये मॅच्युरिटीवर मूळ रकमेची हमी
 • नियमित निश्चित उत्पन्न एमएलडीमध्ये उपलब्ध नाही
 • एमएलडीमध्ये, रक्कम केवळ मॅच्युरिटीवरच मिळते
 • गुंतवणुकीसाठी मोठी रक्कम आवश्यक आहे

‘या’ आठवड्यात कशी होईल शेअर मार्केटची वाटचाल? ‘हे’ फॅक्टर टाकतील परिणाम
मार्केट लिंक्ड डिबेंचरचे विविध प्रकार कोणते आहेत?
मार्केट लिंक्ड डिबेंचर्सचे दोन प्रकार आहेत. प्रिंसिपल प्रोटेक्टेड आणि नॉन प्रिंसिपल प्रोटेक्टेड

मार्केट लिंक्ड डिबेंचर्सचे फायदे

 • पूर्वनिर्धारित पे-ऑफ सुविधा
 • भांडवल आणि व्याज परतफेडीमध्ये प्राधान्य दिले जाते
 • उच्च रिटर्नसाठी उच्च जोखीम घेणार्‍यांसाठी लाभ
 • गुंतवणूकीत विविधता आणण्याचा सर्वोत्तम मार्ग
 • मुद्दल सुरक्षित राहते
 • मार्केट लिंक्ड डिबेंचर कशासाठी योग्य आहेत?
 • सामान्य गुंतवणूकदारांसाठी एमएलडी हा चांगला पर्याय आहे
 • ज्येष्ठ नागरिकही एमएलडीमध्ये गुंतवणूक करू शकतात
 • पोर्टफोलिओमध्ये इतर गुंतवणूक पर्यायांमध्ये समाविष्ट करा
 • चांगल्या पोस्ट टॅक्स रिटर्न्समुळे मोठ्या (HNI) गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय
 • डिबेंचर सुरक्षित किंवा असुरक्षित विचारात घेऊन गुंतवणूक कराSource link

Leave a Reply

Your email address will not be published.