अहमदाबाद: विश्वचषक २०२३ मधील भारत आणि ऑस्ट्रेलियामधील यांच्यातील हायव्होल्टेज अंतिम लढत अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली आहे. हा अंतिम सामना आज १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या अंतिम सामन्यापूर्वी त्याच्याशी संबंधित अनेक नियमांचीही चर्चा सुरू झाली आहे. जर तुम्हाला २०१९ विश्वचषक फायनल आठवत असेल तर, सुपर ओव्हर टाय झाल्यानंतर निकालाबाबत बरेच वाद झाले होते. मात्र यावेळी तो नियम अपडेट करण्यात आला असून इतर अनेक नियमही यावेळी खास आहेत.

अंतिम सामन्यासंबंधित सर्व नियम

जर आपण अंतिम सामन्याशी संबंधित सर्व नियमांबद्दल बोललो तर आपण विशेष नियम जसे की राखीव दिवस, अतिरिक्त वेळ, सुपर ओव्हर, डीआरएस आणि डीएलएस यावर चर्चा करू. याशिवाय नो बॉलशी संबंधित एक खास नियमही आपण जाणून घेऊया. चला तर मग जाणून घेऊया अंतिम सामन्याच्या सर्व नियमांबद्दल:-

राखीव दिवस आणि अतिरिक्त वेळ

उपांत्य फेरीच्या सामन्यांप्रमाणेच आयसीसीने अंतिम सामन्यासाठीही राखीव दिवस ठेवला आहे. पावसामुळे १९ नोव्हेंबरला निकाल जाहीर न झाल्यास सामना २० नोव्हेंबरला त्याच ठिकाणाहून खेळवला जाईल जिथे १९ तारखेला थांबला होता. याशिवाय, अतिरिक्त वेळेचा नियम असा आहे की जर पाऊस पडला तर सामना संपण्यासाठी १२० मिनिटे म्हणजे दोन तासांचा अतिरिक्त वेळ असेल. या कालावधीत सामना न झाल्यास तो राखीव दिवशी खेळवण्यात येईल. राखीव दिवशीही सामना न झाल्यास दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित केले जाईल.

वर्ल्डकप ट्रॉफीसह कॅप्टन्सचं खास फोटोशूट

सुपर ओव्हर

गेल्या विश्वचषकातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या सुपर ओव्हरच्या नियमाबद्दल बोलूया. सामना बरोबरीत सुटल्यावर हा नियम वापरला जातो. पण २०१९ मध्ये सुपर ओव्हरही टाय झाली, त्यानंतर ज्या संघाने सामन्यात जास्त चौकार मारले त्या संघाला म्हणजेच इंग्लंडला विजेता घोषित करण्यात आले. मात्र यावेळी तसे होणार नाही. सुपर ओव्हर टाय झाल्यास, निकाल जाहीर होईपर्यंत सुपर ओव्हरची प्रक्रिया सुरू ठेवण्यास आयसीसीने सांगितले आहे. म्हणजेच जोपर्यंत विजेता मिळत नाही तोपर्यंत सुपर ओव्हरद्वारे सामना खेळवला जाईल.

डीआरएस आणि नो बॉल

यावेळी ऑटो नो बॉलचा नियम आहे, जसे की फील्ड अंपायर नो बॉल देऊ शकत नसेल तर तिसरा अंपायर नो बॉल देऊ शकतो. तर डीआरएस घेतल्यास अल्ट्रा एज, स्प्लिट स्क्रीन, हॉकआई इ. सारखेच राहतील. तसेच, दोन्ही संघांना एका डावात प्रत्येकी दोन डीआरएस मिळतील .



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *