संजय घारपुरे, मुंबई : न्यूझीलंड अखेरच्या सामन्या विजय मिळवून १० गुणांपर्यंत जाऊ शकतो. पण पाकिस्तानने विजय मिळवला तर त्यांचेही १० गुण होऊ शकतात आणि दोन्ही संघांचे समान १० गुण होतात. जर समान गुण असतील तर रन रेट पाहिला जातो, पण जर रन रेटही सारखा असेल तर कोणता संघ सेमी फायनलमध्ये पोहोचू शकतो, याबाबत आयसीसीचा नियम काय आहे, हे आता समोर आले आहे.

भले अफगाणिस्तानला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यांत पराभव पत्करावा लागला असेल, पण त्यानंतरही अफगाणिस्तान अजूनही उपांत्य फेरीच्या शर्यतीत आहेत. अफगाणिस्तान, पाकिस्तान तसेच न्यूझीलंडला उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची संधी आहे. या तिघांचेही दहा गुण होऊ शकतात आणि त्यामुळे निव्वळ धावगती अर्थात नेट रनरेटच्या आधारे सरस कोण हे ठरू शकते. ही चौथ्या क्रमांकाची स्पर्धा भारतासाठी महत्त्वाची आहे. या तिघांत जो कोण शर्यत जिंकणार तो उपांत्य फेरीत प्रवेश करणार आणि त्याची लढत भारताविरुद्ध होणार. आता यातही एक महत्त्वाचे आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात उपांत्य फेरीची लढत झाल्यास ती होणार कोलकाताच्या इडन गार्डनवर. याचवेळी भारतासमोर उपांत्य फेरीत अन्य कोणीही प्रतिस्पर्धी असेल, तर भारताचा हा सामना वानखेडे स्टेडियमवर होईल. असो हे थोडे दूरचे झाले, पण त्यापूर्वी बघूया गुण समान झाले तर आयसीसीची नियमावली काय सांगते
१) गुण समान असल्यास साखळीत जास्त लढती जिंकणारा संघ सरस असेल.
२) गुण आणि विजय समान असतील, तर संघांची क्रमवारी निव्वळ धावगती अर्थात नेट रनरेट नुसार ठरेल.
३) गुण, विजय, निव्वळ धावगतीही समान असल्यास गुण समान असलेल्या संघातील सामन्याच्या क्रमवारीनुसार त्यांची क्रमवारी तयारी होईल. त्यातही गुण तसेच विजय समान असल्यास निव्वळ धावगती निर्णायक होईल.

हे सर्व तीन मुद्दे लक्षात घेतानाच लढतीची क्रमवारीही बघूया. न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात गुरुवारी लढत होईल. त्यानंतर अफगाणिस्तानचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होईल. पाकिस्तानच्या संघाला अखेरची साखळी लढत खेळण्याचा फायदा होईल. त्यांना आपली लढत सुरू होईपर्यंत नेमके काय लक्ष्य आहे, याची जाणीव असेल. चला तयार होऊया वर्ल्ड कप स्पर्धेतील चौथ्या क्रमांकाच्या नव्या स्पर्धेस.

टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियन चाहता, दिल्या ‘भारत माता की जय’च्या घोषणा

ग्लेन मॅक्सवेलने लंगडत झुंज देत ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप वनडे स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला. यापूर्वीच भारत आणि दक्षिण आफ्रिका यांनी अखेरच्या चार संघातील आपले स्थान निश्चित केले आहे. त्यामुळे आता जागा तर एकच शिल्लक, पण स्पर्धक तीन अशी परिस्थिती झाली आहे. खर तर गुरुवारपासून सलग तीन दिवस ही स्पर्धा असेल. त्यातही पाकिस्तानला सगळ्यात जास्त संधी असेल.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *