[ad_1]

अहमदाबाद : भारताला फायनलमध्ये पराभव पत्करावा लागला. पण यावेळी एकच चेंडू भारताच्या पराभवाला कारणीभूत ठरली. कारण हा एकच चेंडू भारताच्या पराभवाचा टर्निंग पॉइंट ठरल्याचे पाहायला मिळाले. ही गोष्ट घडली ती २८ व्या षटकात. त्यावेळी भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा हा फलंदाजी करत होता. त्यावेळी त्याचा सामना करत होता तो मार्नस लाबुशेन. त्यावेळी लाबुशेन हा ३४ धावांवर खेळत होता आणि तो ट्रेव्हिस हेडला चांगली साथ देत होता. त्यामुळे लाबुशेनला बाद करण्यासाठी भारतीय खेळाडू प्रयत्न करत होते. यावेळी २८ व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर ही गोष्ट घडली. बुमराने यावेळी दमदार यॉर्कर टाकला. या यॉर्करचा चांगला सामना लाबुशेनला करता आला नाही. त्याचे टायमिंग चुकले आणि त्यामुळे त्याला या चेंडूवर मोठा फटका मारता आला नाही. यावेळी चेंडू लाबुशेनच्या पायावर जाऊन आदळला. हा चेंडू स्टम्पच्या मार्गात होता. त्यामुळे बुमरासह भारतीय खेळाडूंनी यावेळी जोरदार अपील केले. लाबुशेन यावेळी आऊट असल्याचे दिसत होते. पण पंचांनी यावेळी त्याला नाबाद देण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी चेंडू स्टम्पच्या लाईनमध्ये पडल्यामुळे बुमराने रोहित शर्माला डीआरएस घ्यायला सांगितले. रोहितने त्याचे ऐकले आणि त्याने डीआरएस घेतला. या डीआरएसमध्ये चेंडू स्टम्पच्या लाईनमध्ये पडला होता. त्याचबरोबर तो चेंडू स्टम्पलाही लागत होता. पण यावेळी मैदानातील पंचांनी लाबुशेनला नाबाद ठरवले होते त्यामुळे त्याला तिसऱ्या पंचांना बाद देता आले नाही. जर पंचांनी यावेळी त्याला बाद दिले असते तर फायनलचा निर्णय कदाचित वेगळा लागू शकला असता. पण पंचांनी नाबाद ठरवल्यामुळे लाबुशेन वाचला आणि त्यामुळेच ऑस्ट्रेलियाला विजय साकारता आला. कारण त्यावेळी लाबुशेन बाद झाला असता तर भारतासाठी टर्निंग पॉइंट ठरला असता. त्यामुळे हा एक चेंडू भारतासाठी घातक ठरला आणि सामना भारताच्या हातून निसटला.बुमराने यावेळी पंचांशी थोडा वाद घातला खरा, पण पंचांनी त्याचे काहीच ऐकले नाही आणि आपला निर्णय कायम ठेवला.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *