पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरणात आरोपी गणेश मारणेला अंतरिम अटकपूर्व जामीन देता येणार नाही, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे. मोहोळवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांनी आरडाओरडा करताना मारणेचे नाव घेतले आहे. त्यामुळे गुन्ह्याचे गंभीर स्वरुप पाहता सरकार पक्षाची बाजू ऐकल्याशिवाय मारणेला अंतरिम अटकपूर्व जामीनाचे संरक्षण देता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे या अर्जावर येत्या शनिवारी (३ फेब्रुवारी) सरकार पक्ष म्हणणे मांडणार आहे.

मोहोळ खून प्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यांत आतापर्यंत पंधरा आरोपींना अटक झाली असून, त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे. या गुन्ह्यात आरोपी गणेश मारणे हा मुख्य सूत्रधार असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे गुन्हे शाखेची पथके गणेश मारणेचा कसून शोध घेत आहेत. मात्र, मारणेने पोलिसांना गुंगारा देत पुणे सत्र न्यायालयात अंतरिम अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज केला.

Pune Crime: पुण्यातील कुख्यात गुंड गणेश मारणेवर मकोका कारवाई, मारणे अद्याप फरार
मूळ तक्रारीत गणेश मारणेचे नाव आरोपी म्हणून नाही. पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या पहिल्या रिमांड अहवालात गणेश मारणेला फरारी म्हणून दर्शविलेले नाही. त्यामुळे त्याला अंतरिम अटकपूर्व जामीन देण्यात यावा, असा युक्तिवाद मारणेच्या वकिलांनी केला. मात्र, न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळला. हल्लेखोरांनी आरडाओरडा करत मारणेचे नाव घेतले असून, त्याचे साथीदार असल्याचे सांगितले आहे. हे अर्जदाराचा या गुन्ह्याशी काही संबंध असल्याचा अनुमान लावण्यासाठी पुरेसे आहे, असे आदेशात नमूद करत न्यायालयाने या प्रकरणी सरकार पक्षाला आपले म्हणणे मांडण्यास सांगितले आहे.

दरम्यान, शरद मोहोळ खून प्रकरणात आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या १५ आरोपींसह फरार असलेल्या गणेश मारणेवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (मकोका) कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी मकोका कारवाईचा आदेश काढला.

Hinjewadi Engineer Murder Case: संशयाच्या भुताने झपाटले, लखनऊवरुन थेट पुणे गाठले, हिंजवडी इंजिनिअर हत्याकांडाची A टू Z स्टोरीSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *