जालना: धनगर समाजाला एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी या व इतर मागण्यांसाठी धनगर समाजाच्या वतीने जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चातील आंदोलकांनी आक्रमक होत जालना जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या कार्यालय परिसरात घुसत तोडफोड केली होती. त्यामुळे जालन्यातील वातावरण तणावपूर्ण झाले होते. मात्र, आता या संपूर्ण प्रकरणावर जालना जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पाचांळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले जिल्हाधिकारी

हा प्रकार जो घडला आहे, तो गैरसमजातून घडला असून यात सामंजस्याची आणि सहकार्याची भूमिका जिल्हा प्रशासनाने घेतली असल्याची प्रतिक्रिया जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिलीय. दरम्यान, याप्रकरणी जिल्हाधिकारी यांनी सर्व नागरिकांना जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी शांतता राखावी आणि जिल्हा प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केलंय. तोडफोडीच्या प्रकरणानंतर जिल्हाधिकारी यांनी मोर्चाचे आयोजक यांच्याकडून निवेदन स्वीकारले असून शासनाने काल घेतलेल्या निर्णयाबद्दल माहिती समजावून सांगितल्याचे देखील जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलय.

रात्री दुचाकीवरुन आले अन् घरात घुसले; दरोडेखोरांची शेतमजूर दापत्याला मारहाण, नंतर पलायन, काय घडलं?
१०जण पोलिसांच्या ताब्यात, विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांची माहिती

जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या धनगर मोर्चा दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात घडलेल्या राड्यावर छत्रपती संभाजी नगर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली असून हा प्रकार गैरसमजातून घडला असल्याचं त्यांनी म्हटलं. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सकारात्मक प्रतिसाद सुरू होता मात्र काही गैरसमजुती मुळे मोर्चातील काही तरुणांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर धक्काबुक्की करून जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश करत धुडगूस घालत शासकीय मालमत्तेचे नुकसान केले.

या राड्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून 10 आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यात आल्याचं विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितलय. याचबरोबर आंदोलनात ज्या व्यक्तींचा सहभाग आहे त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येणार असल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलय. दरम्यान, शहरात सध्या शांतता असून परिस्थिती नियंत्रणात आहे. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी कुठल्याही आक्षेपार्य पोस्ट व्हायरल करू नये व समाजात तेढ निर्माण होईल असे वर्तन करू नये असे आवाहन देखील डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी केलंय.

जरांगेंची आरक्षित जातींच्या विरोधात अपमानजनक वक्तव्ये, जाती जोडो अभियानाचे धनंजय कानगुडे यांचा आरोप
कुठलाच अधिकारी निवेदन घेण्यास तयार नव्हता, आंदोलकांचा आरोप

आम्ही संविधानाला मानतो. आम्ही शांततेच्या मार्गाने मोर्चा काढला. काल जिल्हाधिकाऱ्यांना भेटून आपण खाली यावे आम्ही ५ मुलींच्या हाताने आमच्या मागण्यांचे निवेदन देऊ अशी मागणी केली होती. यावर जिल्हाधिकाऱ्यांनीही सांगितलं होत की मी त्यावेळी असेल तर मी स्वतः येईल किंवा अप्पर जिल्हाधिकारी किंवा RDC यांना पाठवू असे धनगर आंदोलकांनी सांगितले. शेवटचे भाषण चालू असताना आमचे लोक निवासी जिल्हाधिकारी यांच्याकडे (आरडीसी) सांगायला गेले की शेवटचे भाषण संपत आले असून आपण कोणी तरी या, पण त्यांनी मी प्रोटोकॉल तोडून येणार नाही असे सांगितले. कुणीच येण्यासाठी तयार नाही असे कळले आणि मग जमावाच्या भावना संतप्त झाल्याची प्रतिक्रिया आंदोलनकर्ते दीपक बोराडे यांनी दिली आहे.

याचवेळी आमच्या सोबत महिला होत्या त्यामुळे आम्ही जमावाला आवरते घेतले. त्याच वेळी एक रुग्णवाहिका जात होती. आम्ही तिला रस्ता करून शिस्त पाळल्याचेही आंदोलनकर्ते म्हणाले. ७० वर्ष झाले धनगर समाजावर अन्याय होतोय. अंतरवालीला जाताना तुम्हाला प्रोटोकॉल नसतो पण धनगर समाज रस्त्यावर उतरला तर तुम्ही निवेदन घेण्यासाठी येत नाहीत असा आरोपही आंदोलनकर्त्यांनी केला आहे. प्रशासनाने हुशार व्हावं आणि आमच्या भावनांचा उद्रेक होऊ देऊ नये असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

जालन्यातील धनगर बांधव आक्रमक; म्हणाले, आज अंतरवाली पेक्षाही वाईट प्रकरण घडलं असतं, नेमकं काय झालं?

Read Latest Maharashtra News And Marathi NewsSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *