नवी दिल्ली : भारताने आशिया चषक २०२३ चे जेतेपद पटकावून तो नवा आशिया किंग ठरला आहे. पण तरीही अंतिम फेरीसाठीही पात्र ठरू न शकलेला पाकिस्तानी संघ आयसीसी वनडे क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचला. हे समीकरण समजण्यापलीकडचे आहे. भारतानंतर श्रीलंकेनेही पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव केला. तरीही पाकिस्तानचा संघ क्रमवारीत पहिल्या नंबरवर कसा काय जाऊ शकतो, असा प्रश्न सर्वांना सतावत आहे. चला जाणून घेऊया काय आहे नेमके समीकरण.

भारताकडून विक्रमी पराभव आणि श्रीलंकेकडून शेवटच्या चेंडूवर झालेल्या पराभवानंतर पाकिस्तान आशिया कपमधून बाहेर पडला. पण दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेचा फायदा त्यांना झाला आहे. जेव्हा पाकिस्तानी संघ आशिया चषक खेळायला आला तेव्हा तो पहिल्या क्रमांकावर होता. पण भारत आणि नंतर श्रीलंकेकडून पराभूत झाल्यानंतर ते दुसऱ्या स्थानावर घसरले होते. अशा स्थितीत ऑस्ट्रेलियाने गेल्या आठवड्यातच पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून क्रमवारीत अव्वल स्थान गाठले होते.

वनडे क्रमवारीतील टॉप-५ संघ
पाकिस्तान
भरात
ऑस्ट्रेलिया
दक्षिण आफ्रिका
इंग्लंड

पाकिस्तानी नेट गोलंदाजाच्या खेळाने विराट कोहली भलताच इम्प्रेस

मात्र सलग तीन सामने गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाने केवळ मालिकाच गमावली नाही तर अव्वल स्थानही गमावले. याचा फायदा पाकिस्तानला मिळाला आणि तो पुन्हा अव्वलस्थानी पोहोचला, तर भारत आठव्यांदा आशियाई चॅम्पियन बनला, पण त्यांच्या शेवटच्या सुपर-फोरच्या सामन्यात बांगलादेशकडून पराभव झाल्याने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर येण्याचे त्यांचे स्वप्न भंगले.

दक्षिण आफ्रिकेतील एकदिवसीय मालिकेतील विजयासह, ताज्या वनडे क्रमवारीत भारत पाकिस्ताननंतर दुसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया तिसऱ्या तर दक्षिण आफ्रिका चौथ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडवर ३-१ ने मालिका जिंकूनही इंग्लंड चौथ्या वरून पाचव्या स्थानावर घसरला. न्यूझीलंडची पाचव्या स्थानावरून सहाव्या स्थानावर घसरण झाली आहे. क्रमवारीत बांगलादेश, श्रीलंका आणि अफगाणिस्तान अनुक्रमे सातव्या, आठव्या आणि नवव्या स्थानावर आहेत. दहाव्या क्रमांकावर असलेल्या वेस्ट इंडिजला विश्वचषकासाठी पात्रता मिळवता आली नाही



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *