मुंबईः राज्यात थंडीचा कडाका वाढला असून येत्या काही दिवसांत गारवा अधिक वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. हवमान विभागाच्या अंदाजानुसार २९ जानेवारीनंतर महाराष्ट्रात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. तर ही थंडीची लाट २ फेब्रुवारीपर्यंत कायम राहिल, अशीही शक्यता आहे.

उत्तरेतील राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढत आहे. जम्मू-काश्मीर बर्फाने आच्छादले आहे. त्यातच पुणे, मध्य महाराष्ट्रातही थंडीचा जोर वाढणार आहे. मुंबईत किमान तापमान सरासरीपेक्षा कमी होऊ शकते, असं हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे. ३० जानेवारीपासून तापमानात लक्षणीय घट होईल, असंही हवामान विभागाकडून सांगण्यात येतंय. गुजरातमार्गे येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे पालघर, उत्तर मुंबई आणि ठाण्यावर अधिक परिणाम जाणवते.

वाचाः देवदर्शनासाठी जाताना ९ जण गेले, मात्र ५ जणच माघारी येणार; एका अपघाताने होत्याचं नव्हतं झालं!

अफगाणिस्तानात थंडीची लाट आली असून ती पूर्वेकडे सरकत आहे. तसंच, राजस्थानातील नैऋत्य भागात चक्रीवादळासारखी स्थिती असल्याने त्याचा परिणाम भारतातील इतर राज्यांवरही होत आहे. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, २७ जानेवारीनंतर काही दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. त्यामुळं किमान तापमानात किरकोळ वाढ होईल. परंतु, दिवसाच्या तापमानात अंशतः घट होऊ शकते.

वाचाः महिला कैदी होणार आर्थिक सक्षम; रद्दी पेपरपासून पाच हजार कागदी पिशव्यांची निर्मिती

राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर भारतात अद्यापही थंडीचा कडाका कायम आहे. राज्यातील इतर भागात थंडीचा जोर २६ जानेवारीपर्यंत कमी होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. मात्र, नवीन अंदाजानुसार आता पुन्हा राज्यात हुडहुडी वाढणार आहे.

वाचाः एका शिक्षकासाठी विद्यार्थी आले रस्त्यावर; घोषणांनी गाव दणाणले, घातला घेराव, जाणून घ्या काय आहे कारण?Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *