दिवाळीनंतर सोने चांदीचे दर कमी होतील, अशी ग्राहकांना अपेक्षा असतानाच, आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या किमतीत वाढ झाल्यामुळे त्याचा परिणाम सोने-चांदीच्या दरावर झाला. सोन्याच्या दरात सातशे रुपये तर चांदीच्या दरात दोन हजार रुपयांनी वाढ झाली आहे.
सोने चांदीच्या दरात वाढ झाल्यामुळे परिणामी दागिने खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याचे चित्र पाहायला मिळाले. दिवाळीत गजबजलेल्या जळगावच्या सराफ बाजारात ग्राहकांची संख्या मंदावली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या किमतीत वाढ झाल्यामुळे सोने-चांदीच्या दरातही वाढ झाल्याचं सराफा व्यावसायिकांचं म्हणणं आहे. आगामी काळात सोन्याचे भाव हे ६५ हजार रुपयांपर्यंत पोहोचतील अशीही शक्यता व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे मात्र सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाल्यामुळे ग्राहकांनी सोने चांदीच्या दागिने खरेदीकडे पाठ फिरवली, परिणामी ग्राहकांचा अल्पसा प्रतिसाद मिळत असल्याचेही यावेळी सुवर्ण व्यावसायिकांनी सांगितले.
अचानक झालेल्या या दरवाढीमुळे गृहिणींचं सुद्धा बजेट कोलमडले आहे. त्यामुळे पाहिजे तशी सोने-चांदीची खरेदी करता आली नाही. सोन्या चांदीच्या दरात वाढ झाल्यामुळे निराशा झाल्याचं खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांनी सांगितले.
Read Latest Jalgaon Updates And Marathi News