अँजेलो मॅथ्यूज फलंदाजीला आला आणि त्याचे हेल्मेट खराब असल्याचे लक्षात आले. तो हेल्मेट बदलून फलंदाजीला येणार तोपर्यंत बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसनने मॅथ्यूज बाद असल्याची अपील केली. मॅथ्यूज असा कसा काय बाद झाला याची चर्चा आता क्रिकेट विश्वास सुरू आहे. यासाठी क्रिकेटचा एक नियम समजून घ्यावा लागले. मॅथ्यूजला टाइम आउट नियमानुसार बाद देण्यात आले.
क्रिकेटमधील टाइम आउट नियम आहे तरी काय आणि फलंदाजाला कसे बाद दिले जाते ते समजून घेऊयात. श्रीलंकेचा मॅथ्यूज हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिली फलंदाज आहे जो टाइम आउट या नियमानुसार बाद झाला.
क्रिकेटमधील नियम ४०.१.१ नुसार कोणत्याही संघाची एखादी विकेट पडते किंवा फलंदाज रिटायर होतो तेव्हा ३ मिनिटाच्या आत नव्या फलंदाजाने चेंडू खेळावा लागतो. जर नव्या फलंदाजाने असे केले नाही तर त्याला टाइम आउट नियमानुसार बाद दिले जाते. अर्थात हा नियम तेव्हाच लागू होतो जेव्हा प्रतिस्पर्धी संघाकडून तशी अपील होत नाही. नियम ४०.१.२ नुसार फलंदाज ३ मिनिटाच्या आत जर मैदानावर आला नाही तर अशा स्थितीत अंपायरकडे हा अधिकार असतो की तो त्याला बाद देईल. या नियमालाच टाइम आउट असे म्हटले जाते.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील या नियमाबद्दल अनेकांना माहिती देखील असेल. पण अशा पद्धतीने एखादा फलंदाज बाद होण्याची ही पहिलीच वेळ आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ६ वेळा अशा पद्धतीने फलंदाजाला बाद देण्यात आले आहे. यात एका भारतीय फलंदाजाचा देखील समावेश आहे.
टाइम आउटने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये बाद होणारे फलंदाज
एड्यू जॉर्डन- ईस्टर्न प्रोविस विरुद्ध ट्रासवाल, १९८७-८८
हेमू्लाल यादव- त्रिपूरा विरुद्ध उडीसा, १९९७
वीसी ड्रेक्स- बॉर्डर विरुद्ध फ्री स्टेट, २००२
ए जे हॅरिस- नॉटिंघमशायर विरुद्ध डरहम, २००३
रायन ऑस्टिन- विंडवर्ड आयर्लंड विरुद्ध कम्बाइड कॅम्पस अॅण्ड कॉलेज- २०१३-१४
चार्ल्स कुंजे- माटाबेलेलँड टस्कर्स विरुद्ध माउंटेनियर्स- २०१७
Read Latest Sports News And Marathi News