नवी दिल्लीः WhatsApp ने एका नवीन फीचरचे अपडेट देणे सुरू केले आहे. रिपोर्टच्या माहितीनुसार, नवीन अपडेट सोबत यूजर्सला कोणत्याही WhatsApp ग्रुपमध्ये ५१२ लोकांचा जोडण्याची सुविधा मिळणार आहे. मेटाने या फीचरची घोषणा गेल्या महिन्यात केली होती. नवीन अपडेट सोबत आता ५१२ लोकांना ग्रुप जोडण्याशिवाय, २ जीबी पर्यंत फाईल शेअर करण्याची सुविधा मिळणार आहे. या नवीन अपडेट शिवाय, इमोजी रिअॅक्शनचे सुद्धा अपडेट आले आहे. WhatsApp मध्ये एक नवीन अन डू फीचरची टेस्टिंग केली जात आहे. या नवीन फीचरच्या मदतीने तुम्ही कुणालाही पाठवलेला मेसेज आता एडिट करू शकाल.

वाचाः Redmi चा १५ हजारांचा स्मार्टफोन ५ हजारांनी स्वस्त, मोठ्या बॅटरीसह फीचर्स मस्त

नवीन फीचरवरून WABInfo ने माहिती दिली आहे. रिपोर्टच्या माहितीनुसार, अनेक यूजर्सला ग्रुप मध्ये ५१२ लोकांना जोडण्याचा ऑप्शन मिळाला आहे. तर काही लोकांना पुढील २४ तासात हा ऑप्शन मिळू शकणार आहे. याशिवाय, WhatsApp द्वारे १०० एमबीची फाइल सुद्धा शेअर केली जावू शकते. परंतु, लवकरच याची मर्यादा २ जीबी होणार आहे. WhatsApp आणखी एका फीचरवर काम करीत आहे. हे फीचर आल्यानंतर यूजर्स गुगल ड्राइव्हच्या चॅनेलला बॅक अप एक्सपोर्ट करू शकतील. म्हणजेच अन्य सर्वर किंवा डिव्हाइस मध्ये बॅक अप घेऊ शकतील. नवीन अपडेट नंतर तुम्ही गुगल ड्राइव्ह वर स्टोर चॅटला पेन ड्राइव्ह मध्ये सेव्ह करू शकता.

वाचाः स्वस्तात मिळतोय iPhone 13; ३८ हजार रुपयाची बचतीची संधी, पाहा ऑफर

सध्या WhatsApp नवीन फीचरची टेस्टिंग करीत आहे. बिझनेस अकाउंटच्या व्हॉट्सअॅप ने हे फीचर यासाठी दिले आहे. की, एकाच अकाउंटवरून अनेक डिव्हाइसमध्ये वापर करण्यात चॅट आणि कॉन्टॅक्ट वरून त्रात होता कामा नये. WhatsApp आपल्या यूजर्ससाठी नेहमी वेगवेगळे व नवीन नवीन फीचर्स आणत असते. याआधीही कंपनीने आपल्या यूजर्ससाठी अनेक फीचर्स आणले होते. आता सुद्धा कंपनी नवीन फीचर्स वर काम करीत आहे. यूजर्संना एक्सपीरियन्स दुप्पट तिप्पट व्हावा यासाठी कंपनी नेहमी प्रयत्नशील असते.

वाचाः धुमाकूळ घालायला येतोय Samsung चा स्वस्तात मस्त स्मार्टफोन, फीचर्स तुमचे मन जिंकेलSource link

Leave a Reply

Your email address will not be published.