नवी दिल्ली:WhatsApp Scam: भारतात इंस्टंट मेसेजिंग अॅप WhatsApp चा वापर करणाऱ्या यूजर्सची संख्या मोठी आहे. कॉलिंग, चॅटिंगपासून ते महत्त्वाच्या फाइल्स, फोटो पाठवण्यासाठी या अॅपचा वापर केला जातो. मात्र, व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून यूजर्सची फसवणूक केली जात आहे. WhatsApp Scam द्वारे यूजर्सला पुन्हा एकदा टार्गेट केले जात आहे. स्कॅमर्स ‘KBC Jio’ लकी ड्रॉ चा फेक मेसेज पाठवून यूजर्सची फसवणूक करण्याचा प्रयत्न करत आहे. असाच एक मेसेज सध्या व्हॉट्सअॅपवर व्हायरल होत आहे. WhatsApp वर या मेसेजसोबत यूजर्सला एक व्हिडिओ देखील पाठवला जात आहे. यामध्ये यूजर्सला बक्षीस जिंकण्याची संपूर्ण प्रोसेस सांगितली जाते. याशिवाय, यूजर्सला त्यांची खासगी माहिती देखील मागितली जाते. यात आधार कार्ड, पासपोर्ट साइज फोटो व इतर माहितीचा समावेश आहे.

वाचा: Recharge Plans: दरमहिन्याला रिचार्जचे टेन्शन विसरा! वर्षभराच्या ‘या’ प्लानमध्ये मिळेल डेटा-कॉलिंगसह हॉटस्टार एकदम फ्री

माहिती पाठवल्यानंतर यूजर्सला एक कागदपत्रं पाठवले जाते. ज्यात त्यांना टॅक्सच्या नावावर काही पैसे पाठवण्यास सांगितले जाते. सायबर गुन्हेगार दावा करतात की, ही रक्कम पाठवल्यानंतर बक्षीसाची संपूर्ण रक्कम दिली जाईल. दरम्यान, तुम्हाला देखील अशाप्रकारचा मेसेज आल्यास यावर कोणताही रिप्लाय देऊ नका. तसेच, इतरांना देखील फॉरवर्ड करू नका. केबीसी हा लोकप्रिय शो आहे. यामुळे अनेकजण सायबर गुन्हेगारांचे शिकार होतात. सायबर गुन्हेगार व्हॉट्सअॅप मेसेजसोबत केबीसीचा लोगो आणि Sony Liv चा फोटो देखील पाठवतात, जेणेकरून यूजर्सला खरे वाटेल.

वाचाः Recharge Plans: संपूर्ण महिन्याभराच्या वैधतेसह येणारे ‘हे’ आहेत बेस्ट रिचार्ज प्लान्स; पाहा कोणती कंपनी देतेय सर्वाधिक बेनिफिट्स

अशा बनावट मेसेजमध्ये तुम्हाला अनेक चुका देखील आढळतील. हे मेसेज हिंदी व इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये असतात. अनेक प्रकरणात यूजर्सला वॉइस मेसेज देखील पाठवला जातो. यात यूजर्सला एक लॉटरी नंबर दिला जातो, जो फेक असतो. तुम्हाला देखील अशाप्रकारचा मेसेज आल्यास यावर कोणताही रिप्लाय देऊ नका. वारंवार अशाप्रकारचा मेसेज आल्यास जवळील सायबर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करा. सायबर गुन्हेगार अशाप्रकारचे बनावट मेसेज पाठवून तुमची खासगी माहिती गोळा करतात व आर्थिक फसवणूक केली जाते. त्यामुळे अशा मेसेजपासून सावध राहायला हवे.

वाचा: अरेच्चा! मनुष्याप्रमाणे विचार करू शकते Google चे AI चॅटबॉट, इंजिनिअरची नोकरी धोक्यातSource link

Leave a Reply

Your email address will not be published.