तिने आपल्या साध्या आणि सुंदर चेहऱ्याने सगळ्यांना मोहिनी घातली होती. श्वेताने छोट्या पडद्यावर काम करायला सुरुवात केली तेव्हा ती फक्त ४ वर्षांची होती. त्याचबरोबर श्वेता मोठ्या पडद्यावरही बालकलाकार म्हणून झळकली. श्वेताने रामानंद सागर यांच्या १९९३ मध्ये आलेल्या ‘श्री कृष्णा’पूर्वी अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. १९८८ मध्ये श्वेता रस्तोगीने ‘खून भरी मांग’मधून पदार्पण केलं आणि अभिनेत्री रेखाच्या मुलीच्या भूमिकेत दिसली. एवढेच नाही तर ‘किशन कन्हैया’ या चित्रपटात श्वेताने अनिल कपूरच्या मुलीची भूमिकाही साकारली होती. असं म्हटलं जातं की श्वेता ऑडिशनमध्ये काही खास कमाल दाखवू शकली नव्हती. मात्र तिचा साधेपणा पाहून रामानंद सागर यांनी तिला एक संधी द्यायचं ठरवलं.
राधाची भूमिका करताना ती फक्त २० वर्षाची होती. मात्र आता ती ५० वर्षाची झाली आहे. या वयातही ती अतिशय फिट आहे. ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रीय असते. ती कायमच तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिचं स्वतःचं युट्यूब चॅनेलदेखील आहे. तर ती अनेक हिंदी मालिकांमध्ये देखील सहायक भूमिकांमध्ये दिसते.