बेंगळुरू : बिटकॉइनच्या व्यापारात सर्व पैसा गमावल्यावर कॉलेजमधून बाहेर पडलेल्या एका तरुण मुलाने ‘The Frustrated drop out’ नावाचे चहाचे दुकान काढले आहे. बेंगळुरू शहरात सध्या या चहाच्या दुकानाची मोठी चर्चा होत आहे. मात्र, ही चहाच्या चवीपेक्षा त्याचे बिल भरण्याच्या पद्धतीसाठी होत आहेत. दुकान मालक देखील पेमेंट म्हणून बिटकॉइन स्वीकारत आहे. यामुळे, क्रिप्टोकरन्सीची जाण असलेल्या लोकांमध्ये चहाचे दुकान खूप लोकप्रिय झाले आहे.

महिलेच्या बँक खात्यात अचानक जमा झाले ५७ कोटी; आलिशान घर घेतले आणि मग जे झाले…
एका अहवालानुसार ग्राहकांनी स्वतः बिटकॉइनद्वारे त्यांच्या चहासाठी पैसे देण्याची ऑफर दिल्यानंतर २२ वर्षीय शुभम सैनीने सुरू केलेल्या चहाच्या दुकानात पेमेंट म्हणून क्रिप्टोकरन्सी स्वीकारण्यास सुरुवात केली. ग्राहकांच्या या ऑफरने स्वतः शुभम देखील चकित झाला कारण तो स्वतः क्रिप्टोकरन्सीचा उत्साही आहे. सैनी म्हणाला की, “कोणत्याही ग्राहकाला, ज्याला पेमेंट करायचे आहे त्याला QR कोड स्कॅन करावा लागेल, UPI प्रमाणेच रुपयाला डॉलरमध्ये रूपांतरित करावे लागेल आणि नंतर क्रिप्टोमध्ये पेमेंट करावे लागेल.”

Ether मध्ये पैसे गुंतवले गेले आहेत, आता आयकर भरण्यास तयार रहा, जाणून घ्या संपूर्ण माहिती
क्रिप्टो पेमेंट केल्यामुळे व्यवसाय वाढला
चहाच्या दुकानाचा मालक शुभम सैनीने सांगितले की पेमेंटचा एक प्रकार म्हणून बिटकॉइन स्वीकारल्याने त्याचा व्यवसायात वाढ झाली आहे. याशिवाय सैनीने दावा केला की आठवड्यातून सरासरी २० नवीन ग्राहक त्यांच्या चहासाठी पैशांच्या रूपात क्रिप्टोकरन्सी वापरतात.

कोण आहे शुभम सैनी?
शुभम सैनी हरियाणातील रेवाडी येथून नोकरीच्या शोधात बेंगळुरूला पोहोचला आणि येथे त्याला क्रिप्टो मार्केटची माहिती मिळाली. २०२० मध्ये बाजार ६० टक्क्यांनी घसरल्याने इतर अनेक गुंतवणूकदारांप्रमाणे सैनीनेही क्रिप्टोकरन्सी खरेदी करण्यात आपले सर्व पैसे खर्च केले. सैनीने म्हटले की त्याने १.५ लाख रुपये गुंतवले होते आणि काही महिन्यांतच त्याचा पोर्टफोलिओमध्ये १००० टक्क्यांनी वाढला. त्यानंतर लवकरच त्याचे क्रिप्टो वॉलेट ३० लाख रुपयांपर्यंत वाढले. त्याच्यासाठी ही खूप मोठी गोष्ट होती.

क्रिप्टोमध्ये गुंतवणुकीचा विचार करताय, जाणून घ्या त्यामधील धोके आणि फायदे
आपल्यातील ही क्षमता पाहून त्याने आई-वडिलांकडे पैसे मागणे बंद केले, स्वतःच्या कॉलेजची फी देखील भरली आणि उदंड आयुष्य जगले. त्याने अंतिम सेमिस्टर सोडले आणि क्रिप्टो ट्रेडिंगच्या बाजारात उतरला. पण पुढील वर्षी, बाजार कोसळल्यामुळे, सैनीच्या क्रिप्टो पोर्टफोलिओमध्ये ९० टक्के घट झाली. या घटनेने २२ वर्षीय सानीला काहीतरी वेगळं करायला भाग पाडलं. त्याने चहाचं दुकान काढलं – ‘द फ्रस्ट्रेटेड ड्रॉप आउट’- जिथे त्याने प्लास्टिक आणि न वापरता येण्याजोग्या वस्तूंचा वापर कमी करण्याचा एक उपक्रम सुरु केला. त्यानंतर P2P पेमेंट प्लॅटफॉर्मची कल्पना सुरु केली. त्याने सांगितले की तो क्रिप्टो पेमेंटसाठी पॅक्सफुल क्रिप्टो प्लॅटफॉर्म वापरतो.

आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र शुभम सैनीने पूर्णवेळ क्रिप्टो ट्रेडिंगसाठी त्याचे बीसीए अंतिम सत्र सोडले. शुभम म्हणाला की, मला वाटले की मी क्रिप्टो जगाचा पुढचा ‘राकेश झुनझुनवाला’ आहे.

indianexpress.com मधील वृत्तानुसारSource link

Leave a Reply

Your email address will not be published.