नवी दिल्ली : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ आता अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत आहे. भारत, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया हे तीन संघ उपांत्य फेरीसाठी निश्चित झाले आहेत. चौथा संघ अद्याप ठरलेला नाही. चौथ्या जागेसाठी ३ संघ अद्याप शर्यतीत आहेत. या स्पर्धेतील पहिला उपांत्य फेरीचा सामना १५ नोव्हेंबरला होणार आहे. टीम इंडियाने लीग टप्प्यात सलग ८ सामने जिंकून पॉइंट टेबलमध्ये पहिले स्थान पटकावले आहे. अशा स्थितीत भारतीय संघ उपांत्य फेरीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या संघाशी भिडणार आहे. पण हा सामना नेमका कुठे खेळवला जाणार आहे हे अजून निश्चित झालेले नाही.

पहिल्या उपांत्य फेरीची तारीख निश्चित झाली आहे, भारतीय संघ चौथ्या क्रमांकावर असलेल्या संघाशी खेळणार हेही निश्चित झाले आहे, मात्र हा सामना कुठे खेळवला जाईल हे अद्याप ठरलेले नाही. पहिल्या उपांत्य फेरीचे ठिकाण श्रीलंका-न्यूझीलंड आणि इंग्लंड-पाकिस्तान यांच्यातील सामन्यांद्वारे निश्चित केले जाणार आहे.

भारतासाठी उपांत्य फेरीचे ठिकाण कसे ठरवले जाईल?

आयसीसीच्या वेळापत्रकानुसार या स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना १५ नोव्हेंबर रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. मात्र, हे ठिकाण कोलकात्याच्या ईडन गार्डनमध्येही बदलले जाऊ शकते. उपांत्य फेरीसाठी चौथा संघ कोण असेल, यावर ठिकाण अवलंबून असणार आहे. जर श्रीलंकेचा पराभव करून न्यूझीलंडने १० गुण मिळवले तर किवी संघ उपांत्य फेरी गाठेल.

अशा परिस्थितीत भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. त्याचवेळी, न्यूझीलंडने जर कोणत्या कारणास्तव उपांत्य फेरी गाठली नाही, तर सामना पाकिस्तानशी होण्याची शक्यता आहे. मात्र, उपांत्य फेरी गाठण्यासाठी पाकिस्तानला इंग्लंडला कोणत्याही परिस्थितीत पराभूत करावे लागेल.

माय नेम इज लखन!; प्रेक्षकांनी गायलं गाणं, विराटने धरला झक्कास ठेका

अशा परिस्थितीत जर भारत विरुद्ध पाकिस्तान असा सेमीफायनलचा सामना होणार असेल तर हा सामना ईडन गार्डन्सवर होणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सुरक्षेच्या कारणास्तव आयसीसीला सांगितले होते की जर त्यांचा संघ उपांत्य फेरीत पोहोचला तर तो मुंबईत सामना खेळणार नाही. त्यांचा उपांत्य फेरीचा सामना ईडन गार्डन्सवर झाला पाहिजे. यामुळेच पहिल्या क्रमांकावर असूनही टीम इंडियासाठी सेमीफायनलचे ठिकाण अजून निश्चित झालेले नाही.

न्यूझीलंड आणि पाकिस्तानशिवाय अफगाणिस्तानचा संघही उपांत्य फेरीच्या शर्यतीत आहे. पॉइंट टेबलच्या समीकरणानुसार, जर पाकिस्तान आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांनी आपला शेवटचा सामना गमावला आणि अफगाणिस्तान संघाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले तर ते उपांत्य फेरीत पोहोचतील. असे झाल्यास भारतीय संघाचा उपांत्य फेरीचा सामना वानखेडेवर होईल. स्पर्धेतील दुसरा उपांत्य सामना १६ नोव्हेंबर रोजी कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळवला जाईलSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *