मुंबई : ऑस्ट्रेलियाच्या संघाने विजयासह सेमी फायनल गाठली आहे. पण त्यांच्या या विजयामुळे सेमी फायनलचे गणित सर्वात सोपे झाले आहे. त्याचबरोबर आता सेमी फायनलमध्ये पोहोचण्याची कोणाला सर्वात चांगली संधी आहे, हे आता समोर आले आहे.आता सेमी फायनलसाठी तीन संघ ठरले आहेत. त्यामुळे आता चौथ्या स्थानासाठी पाकिस्तान, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये शर्यत असणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या सामन्यानंतर आता या तिन्ही संघांचे प्रत्येकी एक सामना उरला आहे. या तिन्ही संघांनी आतापर्यंत आठ सामने खेळले आहेत. या आठ सामन्यांपैकी प्रत्येक संघाने चार सामने जिंकले आहेत, तर चार सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे या तिन्ही संघांचे आता समान आठ गुण झाले आहेत. पण या तिघांपैकी सेमी फायनलमध्ये कोण पोहोचणार, याचे गणित स्पष्ट दिसत आहे. या अखेरच्या सामन्यात जो संघ विजय मिळवेल, त्या संघाला सेमी फायनलमध्ये पोहोचण्याची संधी असेल. पण जर या तिन्ही संघांनी जर विजय मिळवला तर काय होणार, हा प्रश्न सर्वांना पडला असेल. हा प्रश्न रन रेटवर सुटणार आहे. न्यूझीलंडचा रन रेट सध्याच्या घडीला ०.३८९ एवढा आहे. पाकिस्तानचा रन रेट आत्ताच्या घडीला ०.०३६ एवढा आहे. अफगाणिस्तानच्या संघाला पराभव पत्करावा लागला त्यामुळे त्यांचा रन रेट कमी झाला आहे. अफगाणिस्तानचा रन रेट हा हा सध्या -०.३३८ असा आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला सेमी फायनलमध्ये पोहोचण्याची सर्वात जास्त संधी न्यूझीलंडला आहे. पण पाकिस्तान त्यांच्यापेक्षा जास्त मागे रन रेटमध्ये नक्कीच नाहीत. दुसरीकडे अफगाणिस्तानच्या संघानेही मोठा विजय मिळवला तर त्यांना सेमी फायनलमध्ये पोहोचता येऊ शकते. कारण गुणांबरोबर आता रन रेटवर हे समीकरण आले आहे.एक जागा आणि तीन संघ, असे सेमी फायनलचे समीकरण आहे. पण या एका स्थानावर कोणता संघ पोहोचू शकतो, हे आता सोपे झाले आहे. कारण आता तिन्ही संघांचे समान गुण आहेत. त्यामुळे जो जिंकेल त्याला संधी असेल.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *