आमिर खानची मुलगी आयरा खान हिने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला. यात तिने नुपूरसोबत साखरपुडा केल्याची घोषणा केली. नुपूरने अतिशय फिल्मी अंदाजात तिला प्रपोज केलं. दोघांनीही आयुष्याचा प्रवास एकत्र घालवण्याच्या दिशेने पुढचं पाऊल टाकलं आहे. आयराने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अंगठी घालण्यापूर्वी ती नुपूरला कस करताना दिसत आहे. या सगळ्यात अनेकांना प्रश्न पडत आहे की नुपूर शिखरे कोण आहे? नुपूर शिखरे हा फिटनेस ट्रेनर आहे. त्याने Fitnessism ची सुरुवात केली. एवढंच नाही तर तो फिटनेस तज्ज्ञ आणि सल्लागार म्हणूनही ओळखला जातो. तो खूप आधी आयरालाही प्रशिक्षण देत होता. विशेष म्हणजे नुपूरने आयराचे वडील आणि सुपरस्टार आमिर खान यालाही ट्रेनिंग दिली आहे. आमिर खान आणि आयरा खान व्यतिरिक्त नुपूरने सुष्मिताला जवळपास दशकभर प्रशिक्षण दिलं आहे.

फिटनेस ट्रेनरसोबतच नुपूर डान्सरही आहे

२०२० च्या लॉकडाऊनमध्ये आयराने तिच्या फिटनेसवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली. नुपूर तिला प्रशिक्षण देत होता. ट्रेनिंग दरम्यानच नुपूर आणि आयरा यांच्यात जवळीक वाढली आणि दोघांनी डेट करायला सुरुवात केली. फिटनेस ट्रेनर असण्यासोबतच नुपूर डान्सरदेखील आहे. त्याने अनेकवेळा त्याचे डान्सचे व्हिडिओ शेअर केले आहेत. आयराने अधिकृतरित्या २०२१ मध्ये ती नुपूरसोबत नात्यात असल्याचं सांगितलं होतं. आयराने अनेकवेळा नुपूरला तिचा ड्रीम बॉय म्हणूनही सांगितले आहे.

पहिला टॅटू नुपूरच्याच हातावर

आयराने तिचा पहिला टॅटू नुपूरच्या हातावरच काढला होता. तो एक अँकर होता. तिच्या कलेवर विश्वास ठेवल्याबद्दल स्टारकिडने नुपूरचे आभारही मानले होते. नुपूर आणि आयरा एकमेकांच्या कुटुंबाच्या खूप जवळ आहेत. २०२० मध्ये आमिर खान आणि किरण राव यांच्या लग्नाच्या वाढदिवसाला दोघेही एकत्र उपस्थित होते असं म्हटलं जातं. ही पार्टी गिर राष्ट्रीय उद्यानात देण्यात आली होती. यावेळी मोजक्या आणि जवळच्या लोकांनाच आमिर तिथे घेऊन गेला होता. कुटुंबातील एक सदस्य म्हणून खान कुटुंबात नुपूरही होता.

नुपूर- आमिरमध्येही खास बॉण्डिंग

एवढंच नाही तर दोघे आयराचा चुलत भाऊ जैन खानच्या लग्नात आणि विधींमध्येही एकत्र दिसले होते. यावेळी आयराने तिची आई रीना दत्तशी नुपूरची ओळख करुन दिली असंही म्हटलं जात आहे. गेल्यावर्षी इरा आणि नुपूर यांनी दिवाळी आणि नाताळ असे दोन्ही सण एकत्र साजरे केले होते. नुपूर आणि आमिरने तर नाताळला एकसारखे पोशाख दिसले होते. आयरा नुपूरसोबतचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सतत सोशल मीडियावर शेअर करत असते.

व्हॅलेन्टाइन डेलाच शेअर केलेला फोटो

व्हॅलेन्टाइनच्या खास आठवड्यात आयराने नुपूरसोबतचे फोटो शेअर केले होते. तिचे हे रोमॅण्टिक फोटो पाहून आयराने जवळजवळ तेव्हाच तिचं नातं अधिकृत केलं होतं. आयराने प्रॉमिस डेच्या दिवशी नुपूरसोबतचे फोटो पोस्ट केले. यात ‘माय व्हॅलेन्टाइन’ चा हॅशटॅगही दिला होता. आयराने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘तुझ्यासोबत राहणं आणि तुला वचन देणं ही एक अभिमानाची गोष्ट आहे.’ या पोस्टला उत्तर म्हणून नुपूरने इराला ‘आय लव्ह यू’ लिहिलं होतं.’Source link

Leave a Reply

Your email address will not be published.