कोण आहेत मनीष गोयल?
मनीष गोयल एक चार्टर्ड अकाउंटंट असून सीए बनल्यानंतर त्यांनी काही कंपन्यांमध्ये काम केले आणि नंतर स्टॉक गुंतवणुकीत करिअर केले. आजच्या काळात मनीष गोयल भारतीय शेअर बाजारातील एक प्रसिद्ध चेहरा बनले असून त्यांना भारताचे तरुण वॉरन बफेही म्हणूनही संबोधले जाते.
२०१० मध्ये नोकरीचा दिला राजीनामा
सीए झाल्यानंतर मनीष गोयल यांनी २००६ मध्ये रॅनबॅक्सी लॅबोरेटरीज लिमिटेडमध्ये फायनान्स मॅनेजर म्हणून काम केले आणि २०१० पर्यंत काम केले. पण आपले कौशल्य ओळखून त्यांनी शेअर गुंतवणूकदार म्हणून करिअर करण्यास सुरूवात केली आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सामान्य गुंतवणूकदारांना शेअर खरेदीचे सल्ला देण्यास सुरुवात केली. सध्या त्यांची स्वतःची एक स्टॉक वेबसाइट असून इथे ते गुंतवणूकदारांना सल्ला देतात.
मनीष गोयलचा पोर्टफोलिओ
बिझनेस स्टँडर्डच्या अहवालानुसार, गोयल यांनी स्विस ग्लासकोट, केपीआर मिल्स, चमन लाल सेटिया एक्सपोर्ट्स, मोल्ड टेक पॅकेजिंग आणि इतर बर्याच मोठ्या मल्टीबॅगर्सद्वारे गुंतवणूकदारांना प्रचंड संपत्ती निर्माण करण्यास मदत केली. तसेच त्यांनी २०१६ मध्ये त्यांचे टेलीग्राम ब्रॉडकास्ट चॅनल देखील सुरू केले, जेणेकरून ते लोकांना यशस्वी गुंतवणूकदार आणि उद्योजक बनण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मदत करू शकतील.
https://maharashtratimes.com/business/business-news/vijay-shekhar-sharma-success-story-from-earning-rs-100000-to-rs-4-crore-annually/articleshow/103598687.cms
मनीष गोयलची संपत्ती
३० जून २०२३ साठी दाखल केलेल्या कॉर्पोरेट शेअरहोल्डिंगनुसार मनीष गोयल २१.४ कोटी रुपयांच्या एकूण निव्वळ संपत्तीसह दोन सार्वजनिकपणे ट्रेंड केलेल्या कंपन्यांच्या स्टॉकचे मालक आहेत.