[ad_1]

मुंबई : मोदी सरकारच्या विरोधात देशभरातील विरोधकांनी एकजूट करत ‘इंडिया आघाडी’ची स्थापना केली आहे. त्यानंतर जागावाटपाच्या मुद्द्यावर स्थानिक पातळ्यांवर चर्चा सुरु असल्याची माहिती आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील घटकपक्षांनीही जागावाटपाची चर्चा सुरु केल्याचं वृत्त आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस या तीन प्रमुख पक्षांनी आगामी लोकसभा निवडणुका एकत्र लढवण्याचं निश्चित केलं आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील ४८ जागांचा संभाव्य फॉर्म्युलाही ‘टीव्ही९ मराठी’ वृत्तवाहिनीने दिला आहे.

जागावाटपात ठाकरे गटाला १९ ते २१, काँग्रेसला १३ ते १५, तर शरद पवार गटाला १० ते १२ जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ४८ पैकी ४४ मतदारसंघांचे वाटप झाले असून चार जागांवर चर्चा सुरु असल्याची माहिती आहे.

महाविकास आघाडीचे संभाव्य जागावाटप

मुंबई

दक्षिण मुंबई : शिवसेना (ठाकरे गट)
दक्षिण मध्य : शिवसेना (ठाकरे गट)
ईशान्य मुंबई : शिवसेना (ठाकरे गट)
उत्तर पश्चिम मुंबई : शिवसेना (ठाकरे गट)

उत्तर मध्य मुंबई : काँग्रेस
उत्तर मुंबई : काँग्रेस

कोकण

रत्नागिरी सिंधुदुर्ग : शिवसेना (ठाकरे गट)
रायगड : शिवसेना (ठाकरे गट)
कल्याण : शिवसेना (ठाकरे गट)
पालघर : शिवसेना (ठाकरे गट)
ठाणे : शिवसेना (ठाकरे गट)

भिवंडी : राष्ट्रवादी (शरद पवार)

विदर्भ

नागपूर : काँग्रेस
वर्धा : काँग्रेस
चंद्रपूर : काँग्रेस
गडचिरोली : काँग्रेस

भंडारा गोंदिया : काँग्रेस किंवा राष्ट्रवादी (शरद पवार)
अमरावती : काँग्रेस किंवा राष्ट्रवादी (शरद पवार)

यवतमाळ-वाशिम : शिवसेना (ठाकरे गट)
बुलढाणा : शिवसेना (ठाकरे गट)
रामटेक : शिवसेना (ठाकरे गट)
अकोला : वंचित बहुजन आघाडीसाठी राखीव, अन्यथा काँग्रेस

मराठवाडा

नांदेड : काँग्रेस
लातूर : काँग्रेस

धाराशिव : शिवसेना (ठाकरे गट)
छत्रपती संभाजीनगर : शिवसेना (ठाकरे गट)
परभणी : शिवसेना (ठाकरे गट)

बीड : राष्ट्रवादी (शरद पवार)
हिंगोली : राष्ट्रवादी (शरद पवार) किंवा शिवसेना (ठाकरे गट)
जालना : राष्ट्रवादी (शरद पवार) किंवा शिवसेना (ठाकरे गट)

राम-सीता हा फक्त हिंदूंचा वारसा नव्हे, राज ठाकरेंच्या दीपोत्सवात जावेद अख्तर यांचं वक्तव्य

उत्तर महाराष्ट्र

धुळे : काँग्रेस
नंदुरबार : काँग्रेस

जळगाव : राष्ट्रवादी (शरद पवार)
रावेर : राष्ट्रवादी (शरद पवार)
दिंडोरी : राष्ट्रवादी (शरद पवार)
नगर : राष्ट्रवादी (शरद पवार)

नाशिक : शिवसेना (ठाकरे गट)
शिर्डी : शिवसेना (ठाकरे गट)

माधुरी वहिनींना मंत्रिपद नाही, मलाही हुलकावणी, दोघंही नाराज, ठाकरे गटाच्या माजी आमदाराची खंत

पश्चिम महाराष्ट्र

पुणे : काँग्रेस
सोलापूर : काँग्रेस

बारामती : राष्ट्रवादी (शरद पवार)
माढा : राष्ट्रवादी (शरद पवार)
सातारा : राष्ट्रवादी (शरद पवार)
शिरूर : राष्ट्रवादी (शरद पवार)

कोल्हापूर : शिवसेना (ठाकरे गट)
मावळ : शिवसेना (ठाकरे गट)

सांगली : काँग्रेस किंवा राष्ट्रवादी (शरद पवार)

हातकणंगले : स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी राखीव, अन्यथा राष्ट्रवादी (शरद पवार)

३१ डिसेंबरला मुख्यमंत्रीपद जाईल, शिंदेंचा बार उडेल ; संजय राऊतांचा घणाघात

Read Latest Mumbai Updates And Marathi News

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *