ढाका: लहान मुलांना लपाछपी खेळायला खूप आवडतं. जिथे लपायची जागा असेल तिथे लहान मुलांचा खेळ सुरू होतो. लहान मुलांना अतिशय मजेशीर वाटणारा हा खेळ अनेकदा त्यांच्यासाठी धोकादायकही ठरू शकतो. कारण काहीवेळा मुलं धोकादायक जागांवर लपतात आणि संकटात सापडतात. बांगलादेशमधील एका मुलासोबत असाच काहीसा प्रकार घडला. मित्रांसोबत लपाछपी खेळत असताना मुलगा लपला आणि दुसऱ्याच देशात पोहोचला.

बांगलादेशच्या चितगावमध्ये वास्तव्यास असणारा १५ वर्षांचा फहिम नावाचा मुलगा १२ जानेवारीला मित्रांसोबत लपंडाव खेळत होता. आपण कोणालाच सापडू नये यासाठी तो एका कंटेनरमध्ये जाऊन लपला. चुकून त्याच्याकडून कंटेनरचं दार लॉक झालं. यानंतर कंटेनर एमव्ही इंटेग्रा नावाच्या मालवाहू जहाजातून मलेशियाला रवाना झाला. या जहाजात एकूण १ हजार ३३७ कंटेनर्स होते.
पासपोर्ट पाहून तरुणाला एअरपोर्टवर रोखलं; अधिकाऱ्यांना संशय; जन गण म्हणायला लावलं अन् मग…
लहान मुलगा कंटेनरमध्ये अडकल्याची माहिती कोणालाच नव्हती. १७ जानेवारीला मालवाहू जहाज ३२१८ किलोमीटर अंतर कापून मलेशियाच्या क्लांग बंदरावर पोहोचलं. प्रवासादरम्यान फहीम मदतीसाठी आरडाओरडा करत होता. मात्र त्याचा आक्रोश कोणालाच ऐकू गेला नाही. सहा दिवसांत फहीमला पाण्याचा एक थेंबही मिळाला नाही. मात्र सुदैवानं तो जिवंत राहिला. १७ जानेवारीला कंटेनर उघडण्यात आले. त्यावेळी फहीम बाहेर आला. त्याला पाहून अनेकांना धक्का बसला.

तब्बल ६ दिवस कंटेनरमध्ये अडकलेला फहीम मलेशियाच्या भूमीवर पोहोचला. त्याची भाषा कोणालाच कळत नव्हती. त्यामुळे तो कोण, कुठला याची माहिती मलेशियाच्या अधिकाऱ्यांना समजू शकली नाही. अनेकांना मानवी तस्करीचा संशय आला. त्यामुळे पोलिसांना बोलावण्यात आलं. काही वेळात फहीमसोबत घडलेला प्रकार उघडकीस आला. सहा दिवस कंटेनरमध्ये अन्नपाण्याशिवाय राहिल्यानं त्याची प्रकृती बिघडली. त्याला तातडीनं रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.
अक्षयला झोपायला घरी बोलव! नवऱ्याने बायकोला सांगितले; प्रियकर येताच संपवले; २० तुकडे केले
मलेशियाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशीही केली. मात्र हा प्रकार मुलांच्या तस्करीचा नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं. ‘फहीमनं लपण्यासाठी कंटेनरमध्ये शिरला. आतमध्ये अडकला. त्यानं मदतीसाठी आरडाओरडा केला. थोड्या वेळानं त्याला झोप लागली,’ अशी माहिती मलेशियाचे गृहमंत्री दातुक सेरी सैफुद्दिन इस्लाईल यांनी दिली.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *