डोंबिवली: प्रेमसंबंधांतून एका पत्नीने प्रियकराच्या मदतीने कट रचत आपल्या पतीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर उघड झाली आहे. धक्कादायक म्हणजे पतीच्या हत्येनंतर पुरावे नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह एका मोठ्या दगडाला बांधून विहिरीत फेकला. त्यानंतर आपल्यावर संशय येऊ नये म्हणून पती बेपत्ता असल्याची तक्रार देखील पोलिसात दाखल केली. मात्र, चार दिवसांनी मृतदेह विहिरीवरती तरंगत असलेला दिसला. त्यानंतर पोलिसांनी तपास करत पत्नी आणि तिच्या बॉयफ्रेंडला खाकी दाखवत विचारपूस केली. तेव्हा त्यांनीच हत्या केल्याची कबुली दिली. रिता चंद्रप्रकाश लोवंशी आणि तिचा प्रियकर सुमित राजेश विश्वकर्मा असे आरोपींची नावे आहेत.नायलॉनच्या दोरीने गळा आवळून हत्यारिताने दोन अल्पवयीन मित्रांच्या मदतीने २० जानेवारीला पती चंद्रप्रकाश लोवंशी हे कामावरून परतत असताना त्यांचे अपहरण केले. त्याला जंगलात नेत त्याच्यावर चाकूने वार केले. त्यानंतर नायलॉनच्या दोरीने गळा आवळून त्यांची हत्या केली. पुरावे नष्ट करण्यासाठी रात्री दीडच्या सुमारास त्यांचा मृतदेह डोंबिवली आडीवली गावात एका विहिरीजवळ नेला. मृतदेह दगडांनी बांधून विहिरीत फेकून दिला. त्यानंतर स्वतः पोलिस ठाण्यात जात पती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल दिली.अडीवली गावात विहिरीत एका इसमाचा मृतदेह सापडला२५ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास कल्याण ग्रामीण परिसरातील अडीवली गावातील विहिरीत एका इसमाचा मृतदेह सापडला. मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना या मृतदेहास दगडाला बांधून विहिरीत ढकलले असल्याचे निदर्शनास आले. या मृतदेहावर गळ्यावर वार देखील करण्यात आल्याचे दिसून आले. त्यामुळे मानपाडा पोलिसांना या व्यक्तीचे हत्या करून त्याला विहिरीत टाकून दिल्याचा संशय आला. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करत पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू केले. डीसीपी सचिन गुंजाळ एसीपी सुनील कुराडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी राम चोपडे, दत्तात्रय गुंड ,निशा चव्हाण, संपत फडोळ, प्रशांत आंधळे यांच्या पथकाने तपास सुरु केला. अवघ्या काही तासात मृतदेहाची ओळख पटली. चंद्रप्रकाश लोवंशी यांच्या असल्याचे स्पष्ट झाले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *