सेमी फायनलमध्ये पोहोचण्यासाठी अफगाणिस्तानसाठी हा सामान महत्वाचा होता. समोर ऑस्ट्रेलियासारखा दिग्गज संघ होताा. पण अफगािस्तानचा संघ डगमगला नाही. टॉस जिंकत त्यांनी प्रथम फलंदाजी स्विकारली आणि अफगाणिस्तानच्या सलामीवीराने इतिहास रचला. आतापर्यंत अफगाणिस्तानच्या एकाही खेळाडूला वर्ल्ड कपमध्ये शतक झळकावता आले नव्हते. पण ही कसर सलामीवीर इब्राहीम झारदानेन पूर्ण केली. सामान सुरु झाल्यापासून तो मैदानात होता आणि आपला डाव संपेपर्यंत तो खेळपट्टीवरच उभा होता. कारण या सामन्यात त्याने नाबाद १२९ धावांची खेळी साकारली. या शतकासह झारदानने इतिहास रचला आहे. पण दुसरीकडे हा इतिहास सचिन तेंडुलकरच्या मदतीमुळेच रचला गेला आहे, हे आता समोर आले आहे. कारण शतकवीर झारदानने आता एक सिक्रेट गोष्ट सांगितली आहे. शतक पूर्ण झाल्यावर झारदानची एक खास मुलाखत घेतली गेली होती. त्यामध्ये झारदानने एक सिक्रेट सांगितले आहे.
शतक पूर्ण केल्यावर झारदान म्हणाला की, ” या सामन्यापूर्वी सचिन तेंडुलकर आम्हाला भेटायला आले होते. सचिन तेंडुलकर यांच्याशी माझ्या छान गप्पा झाल्या. सचिन यांनी यावेळी आपले अनुभव आमच्याबरोबर शेअर केले आणि त्याचा आम्हाला चांगलाच फायदा झाला. मी सामन्यापूर्वी सांगितले की, मी सचिन तेंडुलकरसारखी फलंदाजी करेन. त्यामुळे माझ्यातील आत्मविश्वास दुणावला गेला आणि शतक पाहायला मिळाले. सचिन यांच्या भेटीनंतर ही गोष्ट होणे महत्वाचे आहे. सचिन यांचे अनुभव आमच्यासाठी मोलाचे ठरले आहेत. यापुढेही त्याचा फायदा आम्हाला नक्कीच होईल.”
अफगाणिस्ताचा सामना होण्यापूर्वी सचिनने संघाला भेट दिली होती. सचिन आणि संघातील खेळाडूंमध्ये बराच काळ चर्चा झाली. यावेळी सचिनने त्यांना आपले महत्वाचे अनुभव सांगितले. या गोष्टीनंतर दुसऱ्याच दिवशी अफगाणिस्तानच्या खेळाडूने इतिहास रचल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सचिनच्या या भेटीचा चांगलाच फायदा त्यांना झाला आहे, हे मात्र नक्की.