लखनऊ: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव झाल्यानं क्रिकेट रसिकांचा हिरमोड झाला. गेल्या दशकभरापासून सुरू असलेला आयसीसी स्पर्धांमधील विजेतेपदाचा दुष्काळ यंदा संपेल अशी आशा क्रिकेट चाहत्यांना होती. पण भारताच्या पराभवानं आशा अपेक्षांवर पाणी फिरलं. भारत वि. ऑस्ट्रेलिया सामना सुरू असताना उत्तर प्रदेशमधील कानपुरात एक धक्कादायक घटना घडली. सामना सुरू असताना लेकानं टीव्ही बंद केल्यानं वडिलांनी त्याचा जीव घेतला.

वर्ल्डकपचा अंतिम सामना पाहण्यासाठी रविवारी कोट्यवधी भारतीय टीव्हीसमोर बसले होते. चकेरीच्या अहिरवामध्ये राहणारे गणेश प्रसाद आणि दीपक निषादही टीव्हीवर अंतिम सामना पाहत होते. तेव्हा मुलगा दीपकनं टीव्ही बंद केला. त्यावरुन वडील गणेश आणि त्याच्यात वाद सुरू झाला. वाद वाढत गेला. वडिलांनी संतापाच्या भरात मुलाचा गळा दाबला. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. मुलाची हत्या प्रकरणात वडिलांना अटक करण्यात आली आहे.
बघता बघता उंची ७ फूट २ इंचांवर; दृष्टीवर परिणाम होऊ लागताच खरं कारण कळलं; विचित्र केस समोर
काल सकाळी ११ वाजता घटनेची माहिती कानपूर पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी गणेशला अटक केली. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, बाप लेकांमध्ये सातत्यानं वाद व्हायचे. बापाला दारुचं व्यसन होतं. त्यावरुन दीपक त्यांना सुनवायचा. दीपकची हत्या केल्यानंतर गणेश तिथून फरार झाला. रविवारी लेकाला संपवल्यानंतर पळून गेलेला गणेश सोमवारी रात्री पोलिसांना सापडला.

पोलीस चौकशीत गणेशनं लेकाच्या हत्येची कबुली दिली. रविवारी भारत वि. ऑस्ट्रेलिया सामना सुरू असताना मुलानं टीव्ही बंद केला. त्यानं मला स्वयंपाक करण्यास सांगितलं. त्यावरुन आमच्यात वाद झाला. भांडण टोकाला गेलं. संतापाच्या भरात मी केबलनं त्याचा गळा आवळला, असं आरोपीनं पोलिसांना सांगितलं.
फ्लॅट २ वर्षांपासून बंद, तरीही मिळायचं भाडं; घरात सापडला मानवी सांगाडा, मजुरांची बोबडी वळली
पिता पुत्रांमध्ये सातत्यानं वाद व्हायचे. वडिलांनी हत्येची कबुली दिली आहे, अशी माहिती एसीपी बृज नारायण सिंह यांनी दिली. क्रिकेट सामना सुरू असताना टीव्ही बंद केल्यानं झालेल्या वादातून वडिलांनी मुलाची केबलनं गळा आवळून हत्या केली. बाप लेकांमध्ये दारुच्या व्यसनावरुन अनेकदा भांडणं व्हायची, असं सिंह यांनी सांगितलं.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *