व्वा! क्या सीन है?? नक्की कोण कुणाचा आका?:संजय राऊतांचा सवाल; फोटो पोस्ट करत सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी वाल्मीक कराडसह इतर आरोपी अद्यापही फरार आहेत. मात्र यात वाल्मीक कराडचे राजकारणाशी असलेले संबंध यामुळे या प्रकरणाची चांगलीच चर्चा सुरू आहे. या संदर्भातलाच वाल्मीक कराड आणि राज्यातील प्रमुख नेत्यांसोबतचा फोटो उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पोस्ट केला आहे. इतकेच नाही तर यावर नक्की कोण कुणाचा आका? असा प्रश्न देखील संजय राऊत यांनी उपस्थित केला. संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर अद्यापही या प्रकरणातील सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात आलेले नाही. त्यामुळे या प्रकरणावरून राज्य सरकारवर टीका होत आहे. यातच आता उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी वाल्मीक कराड याच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या पोस्टच्या माध्यमातून संजय राऊत यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. नक्की कोण कोणाचा आका? असा प्रश्न त्यांनी यामध्ये विचारला आहे. परभणीमध्ये 4 जानेवारी तर पुण्यात 5 जानेवारी रोजी निघणार सर्वपक्षीय शांतता मोर्चा सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी परभणीत 4 तर पुण्यात 5 जानेवारीला सर्वपक्षीय शांतता मोर्चा काढला जाणार आहे. शहरातील विविध सामाजिक संघटना व व्यापारी संघटनेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.परभणीत 4 रोजी सकाळी 11 वाजता नूतन विद्यामंदिर जिंतूर रोड येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर शांती मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. अद्यापही या प्रकरणातील मुख्य आरोपीस अटक झालेली नाही. सरपंच देशमुखांची हत्या झाल्याने त्यांच्या कुटुंबावर संकट ओढवले आहे. त्यामुळे या शांती मोर्चाला नागरिक उपस्थित राहणार आहेत. यासंदर्भात प्रमुख मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात येणार आहे.