जिनेव्हा : जागतिक व्यापार संघटनेची मंत्रिस्तरीय बैठक आजपासून जिनेव्हामध्ये सुरु होत आहे. या बैठकीपूर्वी भारतानं कृषी, मासेमारी आणि करोना लसीवरील बौद्धिक संपदा हक्क याबाबत तयार करण्यात आलेला मसुदा मान्य करण्यास नकार दिला आहे. भारताच्या निर्णयाला जगभरातून पाठिंबा मिळाला आहे. भारताच्या समर्थनार्थ ८० देशांनी भूमिका घेतली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल भारताचं प्रतिनिधित्त्व करणार आहेत.

जागतिक व्यापार संघटना गेल्या २० वर्षांपासून अवैध आणि अनियमित मासेमारीवरील अनुदान रद्द करण्याचा प्रस्ताव ठेवत आहे. स्थायी स्वरुपात मासेमारी करण्याला जागतिक व्यापार संघटना प्रोत्साहन देत आहे मात्र भारत या प्रस्तावाला विरोध करत आहे. शेती प्रमाणं मासेमारी देखील उपजिवीकेचा मुद्दा असल्यानं भारतानं विरोधाची भूमिका कायम ठेवलीय. जागतिक व्यापार संघटनेतील मत्स्यपालन मसुदा चुकीचा होता.

करोनासारख्या जागतिक महामारीचा सामना गरीब देशांनी करण्यासाठी करोना प्रतिबंधक लसीवरील बैद्धिक संपदा हक्काबाबतचे नियम शिथील करण्यात यावेत, अशी भूमिका भारतांनं घेतली आहे. भारताच्या या भूमिकेला देखील अनेक देशांनी पाठिंबा दिला आहे. करोना सारख्या संकटाचा सामना करत असताना लसींवरील बौद्धिक संपदा हक्काच्या अटी शिथील कराव्यात अशी भूमिका भारतानं घेतलीय. तर, विकसित देश आणि मोठ्या कंपन्यांनी मात्र याबाबत विरोधी भूमिका घेतलीय. भारताच्या या भूमिकेला ८० देशांनी पाठिंबा दिला आहे.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.