नवी दिल्ली: Xiaomi Battery Replacement Program: शाओमी इंडियाने भारतीय ग्राहकांसाठी खास बॅटरी रिप्लेसमेंट प्रोग्रामची घोषणा केली आहे. या प्रोग्राम अतंर्गत ग्राहकांना फोनची बॅटरी एका ठराविक किंमतीत बदलता येईल. या प्रोग्राम अंतर्गत ग्राहक फक्त ४९९ रुपये देऊन फोनची बॅटरी बदलू शकतात. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या प्रोग्रामचा फायदा घेण्यासाठी ग्राहकांना कोणत्याही जवळील शाओमी सर्विस सेंटरवर जावे लागेल. जर फोनची बॅटरी बदलायची असेल तर फक्त ४९९ रुपयात तुम्ही बॅटरी बदलू शकता. बॅटरी रिप्लेसमेंट प्रोग्राम अंतर्गत शाओमी, एमआय आणि रेडमी या तीन ब्रँड्सचे फोन्स येतात.

वाचा: Recharge Plans: ‘या’ कंपनीने लाँच केला अवघ्या १०० रुपयांचा प्लान, डेटासह मिळेल ओटीटी सबस्क्रिप्शन

मात्र लक्षात घ्या की, बॅटरी रिप्लेसमेंटची ही सुरुवाती किंमत आहे. फोनच्या मॉडेलनुसार बॅटरीच्या किंमतीत वाढ होऊ शकते. कंपनीने माहिती दिलीये की, Xiaomi Service+ अ‍ॅपवर जाऊन सर्विस सेंटरसाठी ग्राहक अप्वाइंटमेंट बूक करू शकतात. कंपनीनुसार, फोनची बॅटरी खूप स्लो चार्ज होत असेल अथवा लवकर समाप्त होत असल्यास बॅटरी बदलण्याची गरज आहे. तसेच, कंपनीच्या बॅटरी रिप्लेसमेंट प्रोग्राममुळे ग्राहकांना लोकल स्टोरवर जाऊन फोनला दुरुस्त करण्याची गरज पडणार नाही. ग्राहक कंपनीच्या अधिकृत सर्विस सेंटरवर जाऊन फोनची बॅटरी बदलू शकतात व यामुळे फोन पुन्हा नव्यासारखा होईल.

वाचा: Smartphone Offer: अशी संधी पुन्हा नाही! शाओमीच्या प्रीमियम स्मार्टफोनवर आतापर्यंतची सर्वात मोठी सूट, मिळेल १०८MP कॅमेरा

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच Xiaomi ने एकाचवेळी जवळपास ७० स्मार्टफोन्सची लिस्ट जारी केली आहे, ज्यांना यापुढे कोणतेही सॉफ्टवेअर अपडेट मिळणार नाही. या लिस्टमध्ये Redmi Note 7, Redmi K20, Redmi 7, Mi 9 SE आणि Mi Play सारख्या ७० स्मार्टफोन्सचा समावेश आहे. थोडक्यात Xiaomi ने या फोन्ससाठी एंड ऑफ सपोर्टची (EOS) घोषणा केली आहे. सर्वसाधारणपणे शाओमी महिन्याला व दर तीन महिन्याला दोन वर्षांपर्यंत अपडेट जारी करत असते. परंतु, काही प्रीमियम फोनला यापेक्षा जास्त दिवस देखील सिक्योरिटी आणि सॉफ्टवेअर अपडेट मिळते. तुमचा फोन देखील या लिस्टमध्ये असल्यास तुम्ही त्वरित डिव्हाइसला बदलण्याचा विचार करायला हवा.

वाचाः Recharge Plans: संपूर्ण महिन्याभराच्या वैधतेसह येणारे ‘हे’ आहेत बेस्ट रिचार्ज प्लान्स; पाहा कोणती कंपनी देतेय सर्वाधिक बेनिफिट्सSource link

Leave a Reply

Your email address will not be published.