नवी दिल्लीः xiaomi new phone : iPhone 14 Pro जर तुमच्या बजेटच्या बाहेर असेल तर तुमच्यासाठी शाओमी (Xiaomi) कडून एक गुड न्यूज आहे. कंपनी आपल्या नवीन फोनमध्ये iPhone 14 Pro सारखे शानदार डायनामिक आयलँड (Dynamic Island) फीचर ऑफर करू शकते. विबोवर ऑनलाइन चॅटमध्ये यूजर्सने शाओमीचे प्रेसिडेंट Lu Weibing कडे मागणी केली की, अपकमिंग स्मार्टफोन Redmi K60 मध्ये आयोन १४ प्रोचे डायनामिक आयलँड फीचर मिळू शकते. या चॅटमध्ये एका यूजरला रिप्लाय देताना कंपनीचे प्रेसिडेंटने यूजर्सला विचारले की, खरंच, Smart Island फीचर हवे आहे?, कंपनी या फीचरचे नाव स्मार्ट आयलँड ठेवणार आहे.

आधीच केलीय फीचरची कॉपी

शाओमी आपल्या अपकमिंग स्मार्टफोनमध्ये आयफोन १४ सीरीजचे हे फीचर जरूर ऑफर करू शकते. त्यामुळे असे म्हटले जावू शकते की, कंपनी आयफोन्सच्या काही फीचर्सची कॉपी केलेली आहे. २०१७ मध्ये कंपनीने नॉच सोबत iPhone X लाँच केला होता. यानंतर काही दिवसात शाओमीने एकदम हुबेहुब आयफोन एक्स सारखे नॉचचा एक स्मार्टफोन लाँच केला होता.

फ्रंटमधून आयफोन १४ सारखा दिसेल फोन
शाओमी जर नवीन फोनमध्ये लेटेस्ट डायनामिक आयलँड फीचर ऑफर करीत असेल तर हे फोनमध्ये दिसणारे एकदम आयफोन १४ प्रो सारखे वाटू शकते. रियरममध्ये फोनची डिझाइन वेगळी राहण्याची शक्यता आहे. परंतु, शाओमीच्या प्रसिडेंटने खरच यूजर्सशी चॅटमध्ये स्मार्ट आयलँडबद्दल चर्चा केली आहे. हे फीचर खरोखर देणार की नाही यासंबंधी अधिकृतपणे अजून काहीही माहिती समोर आली नाही.

वाचाः iPhone 14 सीरीज लाँच होताच समोर आली iPhone 15 Ultra ची डिटेल्स, धुमाकूळ घालणार फोनची फीचर्स

लवकरच लाँच होणार शाओमी 12T प्रो
शाओमी 12T प्रो याच महिन्यात ग्लोबलल मार्केटमध्ये एन्ट्री करू शकतो. कंपनीचा हा फोन नुकताच बेंचमार्किंग प्लॅटफॉर्म गीकबेंचवर पाहिला गेला आहे. गीकबेंच लिस्टिंगच्या माहितीनुसार, फोनचे मॉडल नंबर 22081212UG आहे. लिस्टिंगच्या माहितीनुसार, कंपनी या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८ झेन चिपसेट देणार आहे. या फोनला १२ जीबी पर्यंत रॅम सोबत आणले जावू शकते. याशिवाय, फोनमध्ये 1220×2712 पिक्सल रिझॉल्यूशन सोबत फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला जावू शकतो. फोटोग्राफीसाठी कंपनी या फोनमध्ये २०० मेगापिक्सलचा मेन कॅमेरा देवू शकते. सेल्फीसाठी फोनमध्ये २० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे. फोनमध्ये 5000mAhची बॅटरी दिली जावू शकते, १२० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट येवू शकते.

वाचाः Facebook वापरताना ‘या’ चुका पडतील महागात, अडकू शकता कायद्याच्या कचाट्यात

वाचाः उद्यापासून वनप्लसचा दिवाळी सेल, १९ हजाराचा स्मार्ट टीव्ही ९ हजार ४९९ रुपयात मिळणारSource link

Leave a Reply

Your email address will not be published.