XYZ माणसाबद्दल मी काही बोलत नाही:अडचणींच्या काळात साथ देणाऱ्या खडसेंबाबत बोलताना पंकजा मुंडे यांची ‘हाताची घडी तोंडावर बोट’
विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे या भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा रंगली होती. त्यातच अनेकदा दसरा मेळाव्यात देखील पंकजा मुंडे यांनी भाजप विरोधात थेट भूमिका घेतल्याचे दिसून आले होते. मात्र, या सर्वात त्यांना भाजपचे नेते एकनाथ खडसे यांची साथ लाभली होती. इतकेच नाही तर स्वतः भाजपमध्ये असताना देखील एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडे यांच्या व्यासपीठावर जात त्यांना जाहीर पाठिंबा दिला होता. मात्र, आता एकनाथ खडसे अडचणीत सापडले असल्याचे दिसून येत आहे. असे असताना पंकजा मुंडे यांनी त्यांच्याबाबत ‘हाताची घडी आणि तोंडावर बोट’ घेतले असल्याचे पाहायला मिळाले. पंकजा मुंडे यांच्या हस्ते राहता येथील पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी त्यांना एकनाथ खडसे यांच्या बद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी XYZ माणसाबद्दल मी काही बोलत नाही. अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली आहे. एकनाथ खडसे काय म्हणाले, याबद्दल मी काय बोलणार? आणि कोणी म्हटले म्हणून मी त्यावर टिप्पणी करत नाही. मी माझ्या भूमिकेवर राजकारण करते. काय काम झाले पाहिजे? हे मी बघत असते, असे देखील पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. प्रमुख नेत्यांना साहजिकच टार्गेट केले जाईल महाविकास आघाडीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केले जात आहे. याबाबत देखील पंकजा मुंडे यांना प्रश्न विचारला होता. दोन पक्ष हे वेगवेगळ्या पद्धतीने राजकारण करत असतात. विरोधी पक्ष आमचा हार घालून सत्कार करतील, असे आम्हाला अपेक्षा नसते. आता निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे प्रमुख नेत्यांना साहजिकच टार्गेट केले जाईल. मात्र आमचे प्रमुख नेते त्यांचे काम करत असल्याची प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलताना पंकजा मुंडे यांनी दिली आहे. राज्यातील इतरही बातम्या वाचा… काँग्रेस सरकार आल्यास 3000 रुपयांची महालक्ष्मी योजना:दरवर्षी 1000 रुपयांची वाढ; प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मोठी घोषणा राज्यामध्ये काँग्रेस सरकार आल्यास लाडकी बहीण योजनेला तोडीस तोड अशी महालक्ष्मी योजना महिलांसाठी आणू. यात तर महिन्याला महिलांना तीन हजार रुपये देण्यात येतील आणि प्रत्येक वर्षाला त्यात हजार रुपयांची वाढ करू, अशी घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यांनी केली आहे. आम्ही लाडकी बहीण योजनेचे स्वागतच केले आहे. मात्र ती योजना कायम राहावी, भगिनींची दिशाभूल होऊ नये, बँकेत पैसे गेले ते बँक वाल्यांनी गायब केले, असे होऊ नये, असे म्हणत नाना पटोले यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. पूर्ण बातमी वाचा….