रश्मिका आणि विजय डेट करत असल्याची चर्चा आधीपासूनच होती. आता या दोघांच्या फोटोमध्ये एक साम्य आढळून आल्याने या रिलेशनशिपच्या अफवांना हवाच मिळाली आहे. या फोटोनंतर ते लिव्ह इनमध्ये राहत असल्याचेही बोलले जात आहे. रश्मिकाने अलीकडे काही फोटो शेअर केले आणि तिच्या या फोटोंचे कनेक्शन विजयने काही दिवसांपूर्वी शेअर केलेल्या फोटोंशी जोडण्यात आले. यानंतरच दोघांच्या लिव्ह इन नात्याबद्दल चर्चांना उधाण आहे आहे.
रश्मिकाने अलीकडेच एका लग्नसोहळ्यातील तिचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. या फोटोसह तिच्या एकटीचे साडीतील काही फोटोही तिने पोस्ट केलेत. या फोटोंपेक्षा त्यामागे असणारा व्ह्यू चाहत्यांच्या नजरेतून सुटला नाही. अनेकांनी कमेंट करत असे म्हटले आहे की, ‘हे विजय देवरकोंडाचे घर आहे’. अन्य एकाने कमेंट केली की, ‘शेवटचे दोन फोटो विजयच्या घरातील आहेत. तर त्यांच्याबद्दल ज्या अफवा होत्या त्या खऱ्या आहेत म्हणायचं तर, चांगली जोडी आहे.’ विजयच्या चाहत्यांनी रश्मिकाच्या फोटोतील टेरेस त्याच्याच घराचे असल्याचा दावा केला आहे.

दरम्यान विजयने गेल्याच आठवड्यात त्याच्या ‘खुशी’ सिनेमाबद्दल एक पोस्ट केली होती. हा सिनेमा प्रदर्शित होण्याला ४ दिवस बाकी असताना त्याने ही पोस्ट केलेली. या पोस्टमध्ये त्याने जे फोटो शेअर केलेत त्यातील व्ह्यू आणि रश्मिकाने आता पोस्ट केलेल्या फोटोतील व्ह्यू जवळपास सारखा आहे. त्यामुळे रश्मिका आणि विजय या दोघांचेही लेटेस्ट फोटो विजयच्या घरातील असल्याची चर्चा आहे. दोघांचे एकाच टेरेसवरील फोटो पाहून ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असल्याचे बोलले जात आहे.
मात्र अद्याप दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल काही उलगडा केलेला नाही. त्यांच्या फॅनपेजवरुन आणि चाहत्यांकडून अशी मागणी केली जात आहे की लवकरच दोघांनी त्यांचे नाते अधिकृत करावे.