मुंबई: ‘नवरी मिळे नवऱ्याला’ या सिनेमाचा आजही मोठा चाहतावर्ग आहे. या सिनेमातील सचिन आणि सुप्रिया पिळगांवकर या जोडीवर आजही प्रेक्षक तितकेच प्रेम करतात. या सिनेमाच्या सेटवरच १७ वर्षांच्या सुप्रिया आणि त्यांच्यापेक्षा १० वर्षांनी मोठे असणारे सचिन यांची प्रेम कहाणी फुलली. ‘नवरी मिळे नवऱ्याला’च्या सेटवरच त्यांची पहिली भेट झाली होती. १९८४ साली हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. दरम्यान या सिनेमात दोघांनी ‘ही नवरी असली…’ या गाण्यावर धमाल डान्स केला होता. सिनेमातील हे गाणं सचिन आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलं होतं. दरम्यान तेव्हा बड्या स्क्रिनवर सचिन-सुप्रिया यांच्यातील जी केमिस्ट्री प्रेक्षकांना अनुभवायला मिळाली, तीच पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे.

Shivali Parab: ‘बिवाली अवली कोहली’साठी शिवाली भावुक; मैत्रिणीच्या कौतुकासाठी शब्द पडले अपुरे
तब्बल ३९ वर्षांपूर्वी आलेल्या सिनेमातील हे गाणं विशेष गाजलं होतं चे सचिन-सुप्रिया यांच्या जोडीमुळे. आता झी मराठीच्या खास कार्यक्रमात ही जोडी पुन्हा एकदा या गाण्यावर परफॉर्म करताना दिसणार आहे. झी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘झी चित्र गौरव २०२३’मध्ये सचिन-सुप्रिया परफॉर्म करणार आहेत. त्यांच्या या परफॉर्मन्ससाठी प्रेक्षक विशेष उत्सुक आहेत.


झी मराठीने इन्स्टाग्रामवर ‘झी चित्र गौरव २०२३’ या सोहळ्यातील सचिन-सुप्रिया यांच्या परफॉर्मन्सची एक झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. या जोडीला एकत्र डान्स करताना पाहणं त्यांच्या प्रेक्षकांसाठी पर्वणीच म्हणावं लागले. त्यांनी विविध चित्रपट आणि ‘नच बलिये’ हा रिअॅलिटी शो त्यांच्या डान्स परफॉर्मन्समुळे गाजवला आहे. आता पुन्हा एकदा त्यांच्याच गाजलेल्या गाण्यावर थिरकताना पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. त्यामुळे वाहिनीकडून शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओवर लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे. सुप्रिया यांनीही त्याच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.

ओंकार भोजनेने हास्यजत्रा सोडणं वनिता खरातसाठी होतं कठीण; म्हणाली- मी त्याला मिठी मारून…
कधी पाहता येईल झी चित्र गौरव २०२३

यंदाचा ‘झी चित्र गौरव पुरस्कार’ येत्या २६ मार्च २०२३ रोजी (रविवार) संध्याकाळी ७ वाजता झी मराठीवर पाहता येणार आहे. सचिन-सुप्रिया यांच्यासह मराठी सिनेविश्वातील अनेक दिग्गज या सोहळ्यात सहभागी होतील. तर अनेक हरहुन्नरी कलाकार आणि कलाकृतींचा सन्मान या सोहळ्यात केला जाणार आहे. याशिवाय साऊथची लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदानाही या कार्यक्रमात सहभागी होणार असून ती लावणी सादर करणार आहे.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *