शास्त्रीय संगीताच्या सादरीकरणातील मर्म युवा कलाकारांनी जाणून घ्यावे:डॉ. विकास कशाळकर यांचा अमृत महोत्सवी सत्कार
भारतीय शास्त्रीय संगीताची परंपरा खूप मोठी अन् गहन आहे. संगीत साधना करणाऱ्या व्यक्तीला संगीताद्वारे जीवनरस मिळत राहतो. संगीत माणसाला खऱ्या अर्थाने ताजेतवाने व टवटवीत ठेवते. संगीत क्षेत्रात संस्काराला अनन्यसाधारण महत्त्व असून शास्त्रीय संगीताच्या सादरीकरणाचे मर्म युवा कलाकारांनी समजून घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन माजी खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी व्यक्त केले. भरत नाट्य संशोधन विद्यालयातर्फे डॉ. विकास कशाळकर यांच्या अमृत महोत्सवी सत्कार सोहळ्याचे भरत नाट्य मंदिर येथे आयोजन करण्यात आले होते. डॉ. कशाळकर यांचा सत्कार डॉ. सहस्रबुद्धे यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. भरत नाट्य संशोधन मंदिराचे अध्यक्ष पांडुरंग मुखडे, विश्वस्त रवींद्र खरे, कार्याध्यक्ष अभय जबडे मंचावर होते. पंडित उल्हास कशाळकर, श्रीकांत कशाळकर, गांधर्व महाविद्यालय, पुणेचे प्राचार्य पंडित प्रमोद मराठे, गोविंदराव बेडेकर, प्रा. प्रकाश भोंडे आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. सहस्रबुद्धे पुढे म्हणाले, शास्त्रीय संगीताची मैफल ऐकताना भावनिक आदानप्रदान होते. यातून मिळणारा आनंद, समाधान भारतीय शास्त्रीय संगीताने समाजाला अनेक वेळा दिले आहे. या संगीत साधनेच्या परंपरेतील परिश्रमी, तपस्वी व्यक्तीमत्त्व असलेल्या कशाळकर यांना संगीत साधनेत अतीव समाधान देणारे दीर्घायुरोग्य लाभो. सत्कार सोहळ्यापूर्वी डॉ. विकास कशाळकर यांच्या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यांना पंडित पांडुरंग मुखडे (तबला), प्रविण कासलीकर (संवादिनी), परिमल कोल्हटकर, अभिषेक कुलकर्णी (तानपुरा, सहगायन) यांनी साथसंगत केली. डॉ. कशाळकर यांनी मैफलीची सुरुवात राग भूपमधील ‘जप ले तू नाम प्रभू का’ या बंदिशीने केली. त्यानंतर वाचस्पती रागातील ‘तू ही करता, सुख के दाता’ ही बंदिश सादर केली. द्रुत लयीत ‘अरज सुनो मोरे साई’ ही रचना अखेरीस सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभय जबडे, रवींद्र खरे यांनी केले. सुरुवातीस ‘यमनरंग’ या सांगीतिक कार्यक्रमात भरत नाट्य संशोधन विद्यालयाच्या बिल्वा द्रविड आणि त्यांच्या शिष्यांचे गायन झाले. यमन रागातील मराठी, हिंदी गीते, नाट्यगीते सादर केली. त्यांना ओंकार श्रोत्री, अमित लिमये (तबला), सचिन घाणेकर (पखवाज), नितीन पुरंदरे (संवादिनी) यांनी साथ केली. त्यानंतर विकास कुचेकर, अमित लिमये, केतकी वैद्य-गोडसे, ओंकार श्रोत्री यांचे एकल तबलावादन झाले. निवेदन लौकिका गोखले-रास्ते यांनी केले.