लखनौ : महिला पोलिस कॉन्स्टेबलला खाकी वर्दी घालून केलेलं रील सोशल मीडियावर शेअर करणं चांगलंच महागात पडलं आहे. उत्तर प्रदेशातील कासगंज येथील एका महिला पोलिसाने रील शेअर केल्यानंतर खळबळ उडाली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कासगंजच्या पोलिस अधीक्षकांनी (एसपी) दखल घेत तिला तात्काळ निलंबित केले.

सहावर पोलिस स्टेशनच्या कॉन्स्टेबल आरती सोलंकी यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे. १९८० मध्ये अमिताभ बच्चन आणि शत्रुघ्न सिन्हा यांची मुख्य भूमिका असलेला अॅक्शन ड्रामा ‘दोस्ताना’ चित्रपटामधील ‘जिंदगी ने दी हवा, थोडा सा धुआ उठा, और आग जल गयी, तेरी मेरी दोस्ती प्यार में बदल गई’ हे आशा भोसले- किशोर कुमार यांच्या आवाजातील गाणं चांगलंच गाजलं होतं. सोलंकी यांनी या गाण्यावर रील बनवला होता. व्हिडिओमध्ये सोलंकी पोलिसांच्या गणवेशात रील बनवताना दिसत आहे.

शिफ्ट बदलणं जीवावर बेतलं, महाडमधील स्फोटात तरुणाचा होरपळून मृत्यू, BSc होण्याचं स्वप्न अधुरं
या व्हिडिओने सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेल्यानंतर, जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकांनी (एसपी) तपास सुरू केला. त्यानंतर आरती सोलंकी यांच्यावर निलंबनाबरोबरच विभागीय कारवाईही सुरू करण्यात आली आहे.

डीजेच्या दणदणाटात मिरवणुकीत नाचणाऱ्या तरुणाचा मृत्यू, पोस्टमॉर्टम अहवालानंतर गूढ वाढलं
मिळालेल्या वृत्तानुसार, सोलंकी या अॅक्टिव्ह इन्स्टाग्राम युजर आहेत. त्या वारंवार त्यांच्या पोलिसी गणवेशातील स्वतःचे व्हिडिओ शेअर करत असतात. ज्या व्हायरल व्हिडिओमुळे त्यांचे निलंबन झाले, तो सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे.’

Read Latest National News And Marathi NewsSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *