मुंबई: गोंधळलेल्या निकामी सरकारचं हे आणखी एक उदाहरण असे म्हणत शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे. जिल्हा परिषदेच्या कनिष्ठ अभियंता पदाच्या परीक्षेसाठी परीक्षा शुल्क म्हणून उमेदवारांकडून हजारो रुपये उकळायचे आणि त्यांना परीक्षेसाठी विचारलेल्या प्राधान्यानुसार जवळचं केंद्र न देता शेकडो कि.मी. लांबवरचं केंद्र द्यायचं हा कोणता कारभार? असा सवालही रोहित पवारांनी विचारला आहे. याबाबत त्यांनी एक्सवर पोस्ट लिहली आहे.

राष्ट्रवादी इंजिनिअर सेलतर्फे जिल्हा परिषद आणि सामान्य प्रशासन विभागाला लिहिण्यात आलेले पत्र रोहित पवारांनी शेअर केले आहे. यापत्रात विद्यार्थ्यांना सहन कराव्या लागणाऱ्या अडचणींचा पाढा वाचण्यात आला आहे. जिल्हा परिषद ज्युनिअर इंजिनिअर पदाच्या ऑनलाईन परिक्षेकरता उमेदवारांना ३००-४०० किमी दूरवरील परिक्षाकेंद्र मिळत आहेत असा आरोप करण्यात आला आहे. तसेच १००० आणि ९०० रुपये इतकी परीक्षा फी शुल्क आकारुनसुद्धा दिलेल्या तीन पर्यायांमधून पसंतीचे परीक्षा केंद्र मिळत नाही हे अंत्यत अव्यावसायिक आहे असे या पत्रात म्हटले आहे.

गजाभाऊ मुलासाठी तुम्ही पक्षाशी बेईमानी करताय, वय झाल्यानं भ्रमिष्ठ झालात, रामदास कदमांचा कीर्तिकरांवर पलटवार
आधीच उमेदवार बेरोजगारीमुळे अडचणीत आहेत आणि आता त्यांना परीक्षा केंद्राजवळ प्रवास आणि राहण्याचा खर्च सहन करावा लागतोय. सांगलीला पंसती असलेल्या उमेदवारांना मुंबईतील परीक्षा केंद्र मिळत आहेत आणि जळगावला प्राधान्य असलेल्या उमदेवारांना लातूर केंद्र मिळत आहे ही कोणत्या प्रकारची तार्किक व्यवस्था आहे असा सवाल राष्ट्रवादी शरद पवार गटाने विचारला आहे.

परीक्षा वेळ सकाळी ७ वाजताची असून १५ मिनिटे अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्याच्या लेखी सूचना दिल्या असून परीक्षार्थी १५ मिनिटे अगोदर उपस्थित न राहिल्यास ऑनलाइन परीक्षा देऊ शकणार नाहीत अशी लेखी सूचना दिल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. परीक्षार्थींना निवडलेल्या ठिकाणी अथवा जवळच्या ठिकाणी परीक्षा देण्याची मुभा द्यावी तसेच परीक्षेची वेळ सकाळी ९ वाजता करण्यात यावी अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे.

शेतकऱ्याची लेक झाली पीएसआय; २ वेळा संधी हुकली, नशीबाने परीक्षा घेतली, तरी जिद्दीने केलं कष्टांचं चीज

Read Latest Maharashtra News And Marathi News



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *