दिल्लीतील आपचे आमदार नरेश बाल्यान पोलिसांच्या ताब्यात:खंडणी व धमकावण्याचे आरोप; भाजपने गुंडासह ऑडिओ क्लिप जारी केली होती
आम आदमी पक्षाचे (आप) आमदार नरेश बाल्यान यांना शनिवारी रात्री दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. 2023 सालच्या खंडणी प्रकरणात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे. सध्या त्यांची चौकशी सुरू आहे. शनिवारीच भाजपने उत्तम नगर विधानसभा मतदारसंघातील आमदार बाल्यान यांची ऑडिओ क्लिप प्रसिद्ध केली होती. नरेश एका गुंडाशी संबंधित असून तो खंडणी टोळी चालवतो, असे भाजपचे म्हणणे आहे. ते हवालाद्वारे पैशांचा...