कोलकाता विमानतळावर उडान यात्री कॅफे सुरू झाला:चहा ₹10 आणि कॉफी-समोसा ₹20; ‘आप’चे खासदार राघव चढ्ढा यांनी संसदेत सुचवले होते
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने कोलकाता येथील नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर ‘उडान यात्री कॅफे’ सुरू केले आहे. विमानतळावर स्वस्तात खाद्यपदार्थ विकणारा हा पहिलाच कॅफे आहे. येथे पाण्याची बाटली आणि चहा 10 रुपयांना मिळेल. तर समोसा, कॉफी आणि मिठाई 20 रुपयांना मिळणार आहे. आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात भारतीय विमान वाहतूक विधेयक 2024 वर चर्चेत...