बीडमधील मराठा मेळाव्यात मनोज जरांगे यांना भाषणानंतर भोवळ:खासगी रुग्णालयात दाखल; डॉक्टर प्रकृतीवर नजर ठेवून
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती शुक्रवारी सायंकाळी अचानक बिघडली होती. बीडमधील मराठा प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी मेळाव्यात भाषण करताना त्यांना अशक्तपणा जाणवला. त्यांनी व्यासपीठावर बसूनच 45 मिनिटे भाषण केले. भाषण संपल्यानंतर ते भावुक झाले. डोळ्यांत अश्रू आले. त्यानंतर त्यांना भोवळ आली. उपस्थितांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावली. नंतर जरांगे पाटील यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर नजर ठेवून...