Maharashtra

बिनविरोध निवडीविरोधात MNS, काँग्रेस अखेर हायकोर्टात:HC च्या निगराणीखाली चौकशी करण्याची मागणी; EC च्या तटस्थतेवर बोट

राज ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना व काँग्रेसने अखेर महापालिका निवडणुकांत बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेद्वारे या दोन्ही पक्षांनी राज्य निवडणूक आयोगाच्या पारदर्शक...

नारायण राणेंची प्रकृती बिघडली:भाषणावेळी स्टेजवर आली भोवळ, समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण; कालच दिले राजकीय निवृत्तीचे संकेत

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना चिपळूण येथील कृषी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी भाषण करताना स्टेजवरच अचानक भोवळ आल्याने खळबळ उडाली. त्यानंतर त्यांच्या सुरक्षरक्षकांनी त्यां...

शरद पवार यंदा खासदार बनू शकणार नाहीत:असदुद्दीन ओवेसी यांनी सांगितले राज्यसभेचे गणित; आमदारांचे संख्याबळ नसल्याकडे बोट

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यावेळी राज्यसभेवर निवडून जाण्याची शक्यता नसल्याचा दावा एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी केला आहे. शरद पवारांकडे राज्यसभेवर प...

भाजपमध्ये मुख्यमंत्र्यांविरोधात मोठा गट सक्रिय झालाय:भविष्यात मोठा स्फोट होणार; मुनगंटीवारांच्या नाराजीवरून नाना पटोलेंचा गौप्यस्फोट

राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये महायुतीचे ६८ नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याने विरोधकांनी रान उठवले आहे. या प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचा आरोप करत काँग्रेस नेते नाना पटोले यांनी थेट निवडणूक आयोगा...

परळी धनुभाऊंना दिली, मी माळाकोळी सांभाळेन:पंकजा मुंडे यांच्या विधानाची खमंग चर्चा; लोहा विधानसभा लढवणार का? असा सवाल

मी परळी धनंजय मुंडे यांना देऊन टाकली. आता ते परळी सांभाळतात आणि मी माळाकोळी सांभाळेन, असे विधान भाजप नेत्या तथा राज्याच्या कॅबिनेट पंकजा मुंडे यांनी सोमवारी केले आहे. परळी विधानसभा मतदारसंघ हा पंकज...

बिनविरोध निवडी हा चांगला पायंडा:यामध्ये नियमांचे उल्लंघन होण्यासारखे काय आहे? चंद्रशेखर बावनकुळेंचा विरोधकांना सवाल

बिनविरोध निवडीवरून राजकारण तापलेले असतानाच, निवडणूक बिनविरोध व्हायला काय हरकत आहे? हा एक चांगला पायंडा आहे. यामध्ये नियमाचे उल्लंघन होण्यासारखे काय आहे? असा प्रतिसवाल भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे य...

राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला सेवानिवृत्त:नायगावात 'गार्ड ऑफ ऑनर'ने मानवंदना, 26/11 चे हिरो सदानंद दाते नवे डीजीपी

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला ३७.५ वर्षांच्या प्रदीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीनंतर आज सेवानिवृत्त झाल्या. मुंबईतील नायगाव पोलिस मैदानावर आयोजित एका सोहळ्यात त्यांना निवृत्...

पुण्यात शिवसेनेचा 'शंखनाद':आम्हाला भाजपवर टीका करण्याची गरज नाही, ते काम अजित पवार चोख पार पाडत आहेत - उदय सामंत

पुणे महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने १२० उमेदवार मैदानात उतरवले आहेत. "आमच्या मित्रपक्षाला वाटले होते की आम्ही ४० उमेदवारही उभे करू शकणार नाही, पण आम्ही काही तासांतच...

'फ्लड डायव्हर्शन'चा पहिला टप्पा लवकरच:शहरांना पुरापासून मिळणार संरक्षण अन् दुष्काळी भागाला पाणी - मुख्यमंत्री फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगलीत भाजपच्या महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी त्यांनी सांगली व कोल्हापूर सारख्या शहरांचे पुराच्या पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी फ्लड डाय...

महाराष्ट्राचे समाजमन सुन्न करणारी घटना:प्रसुतीसाठी जंगलातून 6 KM पायपीट; प्रथम बाळ अन् नंतर मातेचा मृत्यू; गडचिरोलीची घटना

विकसित भारत आणि प्रगत महाराष्ट्राच्या गप्पा मारल्या जात असताना, गडचिरोलीतील एटापल्ली तालुक्यात राज्याच्या आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे काढणारी एक हृदयद्रावक घटना घडली आहे. या ठिकाणी एका मातेला प्रसूती...

जामगव्हाण तांडा शिवारात जुगार अड्ड्यावर छापा:३ दुचाकी, ४ मोबाईलसह ३.०५ लाखांचा मुद्देमाल जप्त; पोलिस अधीक्षकांच्या पथकाची कामगिरी

आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यांतर्गत जामगव्हाण तांडा शिवारात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने झन्नामन्ना जुगार अड्डयावर छापा टाकून ३ दुचाकी, ४ मोबाईलसह ३.०५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरण...

सावित्रीबाई फुलेंचे जन्मगाव नायगावच्या नामांतराची मागणी:CM फडणवीस म्हणाले - ग्रामसभेने ठराव पाठवल्यास विनाविलंब निर्णय घेणार

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी म्हणजेच नायगाव येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केली आहे. "नायगावचे नामांतर सावित्रीबाईंच्या नावाने करावे अशी ...

मराठी साहित्य संमेलनाला गालबोट:संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्या तोंडाला फासले काळे; आंदोलक पोलिसांच्या ताब्यात

साताऱ्यात आयोजित अखिल भारतीय मराठी संमेलनात आज एक खळबळजनक घटना घडली. या संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्या तोंडाला आज एका व्यक्तीने काळे फासले. हा व्यक्ती रिपाइंचा कार्यकर्ता असल्याचा दा...

'बिनविरोध'साठी मनसेच्या पदाधिकाऱ्याचा मर्डर:आता ही घटना कौटुंबिक वादातून घडल्याचा दावा होईल, खासदार प्रणिती शिंदे संतापल्या

सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत बिनविरोध निवडून येण्यासाठी मनसेच्या एका पदाधिकाऱ्याची हत्या करण्यात आल्याची भयंकर घटना घडली आहे. काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी या प्रकरणी भाजपला आरोपीच्या पिंज...

देवा देता है तो छप्पर फाडके देता है!:छगन भुजबळांकडून मुख्यमंत्र्यांचे कौतुक, नायगावचे नाव क्रांतीज्योती सावित्रीनगर करण्याची मागणी

"आज सावित्रीबाईंच्या स्मारकासाठी १५० कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन झाले आहे. मात्र, एक काळ असा होता की याच नायगावमध्ये सावित्रीबाईंचे घर उभारण्यासाठी आम्हाला २५-३० लाख रुपयांसाठीही सरकारी नियमांच...

राज्य सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा:2 लाखांपर्यंतच्या पीक कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारने बँकेकडून पीक कर्ज घेताना लागणारे तारण शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय 1 जानेवारी 2026 पासून लागू होणार आहे. त्याचा राज्य...