1 देश-1 निवडणूक विधेयक आज संसदेच्या पटलावर नाही:अनिश्चित काळासाठी पुढे ढकलले जाण्याची शक्यता

एक देश-एक निवडणुकीशी संबंधित दोन विधेयकांना नुकतीच केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली होती. यानंतर असे सांगण्यात आले की, विधेयक सोमवारी संसदेत सादर केले जाईल. शुक्रवारी जारी संसदेच्या कार्यसूचीत विधेयक सोमवारी लोकसभेत मांडण्यात येणार, अशी माहिती देण्यात आली. सरकारकडूनही याची तयारी सुरू होती. तथापि, सुधारित कार्यसूची आली तेव्हा यात विधेयकाचा उल्लेख नाही. सध्या यावर कोणतेच अधिकृत वक्तव्य आलेले नाही. विधेयक न आणण्याचा निर्णय का घेण्यात आला व आता हे विधेयक कधी आणले जाईल हेदेखील स्पष्ट नाही. तथापि, केंद्र सरकार आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात नवे आयकर विधेयक आणणार नाही. ही शक्यता अर्थ मंत्रालयाने फेटाळली. राज्यसभेत संविधानावर आज चर्चा : संविधानाला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल सोमवारपासून राज्यसभेत दोन दिवसांची चर्चा सुरू होईल. याची सुरुवात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह करतील. जे. पी. नड्डा आणि भूपेंद्र यादव हेदेखील यावर बोलणार आहेत.

Share