Monthly Archive: September, 2024

माझ्या विरोधात अनेक जण लढून थकले, आता कोणालाही येऊ द्या:शरद पवारांच्या खेळीविरोधात मंत्री महाजन यांनीही थोपटले दंड

माझ्या विरोधात अनेक जण लढून थकले, आता कोणालाही येऊ द्या:शरद पवारांच्या खेळीविरोधात मंत्री महाजन यांनीही थोपटले दंड

जळगाव जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का देण्याची तयारी शरद पवार करत आहेत. मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात भाजपचे नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोपडे यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची शिवस्वराज्य यात्रा ही 21 तारखेला जळगाव जिल्ह्यात दाखल होणार आहे. या यात्रेदरम्यान खोपडे यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. मात्र, खोपडे यांच्या प्रश्नावर गिरीश महाजन यांनी काहीही बोलण्यास नकार दिला आहे. गेल्या सहा टर्मपासून माझ्या विरोधात अनेक जण लढून थकले आहेत. आता कोणालाही येऊ द्या, अशा शब्दात गिरीश महाजन यांनी खोपडे यांच्या प्रश्नावर प्रत्युत्तर दिले. गणपती बाप्पाचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे. त्याला काय करायचे हे माहिती आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचे सरकार मोठ्या मताधिक्यात येणार असल्याचा दावा देखील मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. दिलीप खोपडे यांच्याबाबत बोलण्यात मात्र त्यांनी नकार दिला. गेल्या सहा टर्म पासून आपल्या विरोधात अनेक जण लढा देऊन थकले आहेत. आता कोणालाही येऊ द्या, घोडा आणि मैदान समोरच आहे. निवडणूक संपल्यावर माझ्याशी बोला, अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी माध्यमांना दिली आहे. दिलीप खोपडे हे जळगाव जिल्ह्यातील मराठा नेते म्हणून ओळखले जातात. जामनेर मतदार संघात मराठा समाजाचे एक लाख 40 हजार मतदार आहेत. त्यामुळे दिलीप खोपडे हे मंत्री गिरीश महाजन यांच्या समोर मोठे आव्हान उभे करू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यात आता खोपडे हे शरद पवार यांच्या गटात प्रवेश करणे करणार असल्याने या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा… महाविकास आघाडीची आज बैठक:जागावाटपावर 15 दिवस चर्चा होणार; काँग्रेस 288 पैकी 120 जागांवर लढवण्याच्या तयारीत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील जागावाटपाबाबत महाविकास आघाडी 18 ते 20 सप्टेंबर दरम्यान मुंबईत बैठक घेणार आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी मंगळवारी (17 सप्टेंबर) ही माहिती दिली. या बैठकीत मविआमधील प्रत्येक पक्षाला किती जागा आणि कोठे मिळतील याचे सूत्र ठरवले जाईल, असे राऊत म्हणाले. पूर्ण बातमी वाचा…

​जळगाव जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का देण्याची तयारी शरद पवार करत आहेत. मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात भाजपचे नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोपडे यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची शिवस्वराज्य यात्रा ही 21 तारखेला जळगाव जिल्ह्यात दाखल होणार आहे. या यात्रेदरम्यान खोपडे यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. मात्र, खोपडे यांच्या प्रश्नावर गिरीश महाजन यांनी काहीही बोलण्यास नकार दिला आहे. गेल्या सहा टर्मपासून माझ्या विरोधात अनेक जण लढून थकले आहेत. आता कोणालाही येऊ द्या, अशा शब्दात गिरीश महाजन यांनी खोपडे यांच्या प्रश्नावर प्रत्युत्तर दिले. गणपती बाप्पाचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे. त्याला काय करायचे हे माहिती आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचे सरकार मोठ्या मताधिक्यात येणार असल्याचा दावा देखील मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. दिलीप खोपडे यांच्याबाबत बोलण्यात मात्र त्यांनी नकार दिला. गेल्या सहा टर्म पासून आपल्या विरोधात अनेक जण लढा देऊन थकले आहेत. आता कोणालाही येऊ द्या, घोडा आणि मैदान समोरच आहे. निवडणूक संपल्यावर माझ्याशी बोला, अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी माध्यमांना दिली आहे. दिलीप खोपडे हे जळगाव जिल्ह्यातील मराठा नेते म्हणून ओळखले जातात. जामनेर मतदार संघात मराठा समाजाचे एक लाख 40 हजार मतदार आहेत. त्यामुळे दिलीप खोपडे हे मंत्री गिरीश महाजन यांच्या समोर मोठे आव्हान उभे करू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यात आता खोपडे हे शरद पवार यांच्या गटात प्रवेश करणे करणार असल्याने या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा… महाविकास आघाडीची आज बैठक:जागावाटपावर 15 दिवस चर्चा होणार; काँग्रेस 288 पैकी 120 जागांवर लढवण्याच्या तयारीत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील जागावाटपाबाबत महाविकास आघाडी 18 ते 20 सप्टेंबर दरम्यान मुंबईत बैठक घेणार आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी मंगळवारी (17 सप्टेंबर) ही माहिती दिली. या बैठकीत मविआमधील प्रत्येक पक्षाला किती जागा आणि कोठे मिळतील याचे सूत्र ठरवले जाईल, असे राऊत म्हणाले. पूर्ण बातमी वाचा…  

देशाचा मान्सून ट्रॅकर:यूपीतील 235 गावे पाण्याखाली, 4 लाख लोक प्रभावित, प्रयागराजमध्ये शाळा बंद; बंगालच्या 9 जिल्ह्यांमध्ये पूर

उत्तर प्रदेशातील पावसामुळे 21 जिल्ह्यांतील 4 लाख लोक प्रभावित झाले आहेत. लखीमपूर खेरीतील 220 गावे आणि जालौनमधील 15 हून अधिक गावे यमुनेच्या पाण्यात बुडाली आहेत. वाराणसीतील गंगा धोक्याच्या चिन्हापासून अवघ्या 44 सेमी दूर आहे. 85 घाट आणि 2000 छोटी-मोठी मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. प्रयागराजमध्ये आज आठवीपर्यंतच्या शाळा बंद आहेत. पश्चिम बंगालमधील बीरभूम, बांकुरा, हावडा, हुगळी, उत्तर-दक्षिण 24 परगणा, पूर्व-पश्चिम मेदिनीपूर,...

पुढील आठवड्यापासून MI-17 हेलिकॉप्टरने कैलास दर्शन:खर्च 75 हजार रुपये; 55 वर्षे वयापर्यंतच्याच व्यक्तींनाच प्रवास करण्याची परवानगी

भारतातून कैलास पर्वताच्या दर्शनासाठी आतुर असलेल्या भाविकांसाठी मोठी बातमी आहे. उत्तराखंडच्या पिथौरागढ जिल्ह्यातील जुन्या लिपुलेखच्या टेकड्यांवरून पुढील आठवड्यापासून MI-17 हेलिकॉप्टरद्वारे कैलास पर्वताचे दर्शन सुरू होईल. त्याची घोषणा दोन-तीन दिवसांत होऊ शकते. या प्रवासासाठी 75 हजार रुपये खर्च येणार आहे. कैलास पर्वत चीनच्या ताब्यात असलेल्या तिबेटमध्ये आहे आणि चीनची सीमा व्ह्यू पॉईंटपासून 10 किमी अंतरावर आहे. व्ह्यू पॉईंटची उंची 14 हजार...

हरियाणात आज भाजप जाहीरनामा प्रसिद्ध करणार:रोहतकमध्ये जेपी नड्डांची उपस्थिती; तरुण, शेतकरी आणि गरीबांवर लक्ष केंद्रित

भाजप आज रोहतकमध्ये हरियाणासाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे. त्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जेपी नड्डा रोहतकला पोहोचणार आहेत. त्यांच्यासोबत हरियाणाचे मुख्यमंत्री नायबसिंग सैनी, भाजप प्रदेशाध्यक्ष मोहनलाल बडोली, प्रदेश प्रभारी डॉ. सतीश पुनिया आणि जाहीरनामा समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश धनखर आदी नेतेही उपस्थित राहणार आहेत. यावेळी भाजप आपल्या जाहीरनाम्यात तरुण, शेतकरी आणि गरीब वर्गासाठी विशेष घोषणा करू शकते. भाजपने...

महाविकास आघाडीची आज बैठक:जागावाटपावर 15 दिवस चर्चा होणार; काँग्रेस 288 पैकी 120 जागांवर लढवण्याच्या तयारीत

महाविकास आघाडीची आज बैठक:जागावाटपावर 15 दिवस चर्चा होणार; काँग्रेस 288 पैकी 120 जागांवर लढवण्याच्या तयारीत

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील जागावाटपाबाबत महाविकास आघाडी 18 ते 20 सप्टेंबर दरम्यान मुंबईत बैठक घेणार आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी मंगळवारी (17 सप्टेंबर) ही माहिती दिली. या बैठकीत मविआमधील प्रत्येक पक्षाला किती जागा आणि कोठे मिळतील याचे सूत्र ठरवले जाईल, असे राऊत म्हणाले. जागावाटपाचा निर्णय उमेदवारांच्या विजयाच्या शक्यतेवर आधारित असेल. मविआमध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना, शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आणि काँग्रेस यांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीत 13 जागा जिंकल्यानंतर काँग्रेसचे मनोबल वाढले आहे. या कारणास्तव पक्ष अधिक जागांची मागणी करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसला महाराष्ट्रातील एकूण 288 विधानसभा जागांपैकी 110-120 जागांवर विधानसभा निवडणूक लढवायची आहे. 31 ऑगस्ट रोजी झाली महायुतीची बैठक महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीची (भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी) दुसरी फेरी 31 ऑगस्ट रोजी पार पडली. राष्ट्रवादीच्या सूत्रांनी एएनआयला सांगितले की, 3 तास चाललेल्या या बैठकीत महाराष्ट्रातील 288 पैकी 173 जागांवर सहमती झाली आहे. भाजपला जास्तीत जास्त जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाजपनंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीला जागा मिळतील. मात्र, कोणत्या पक्षाला किती जागा देण्याचे मान्य झाले, याची माहिती समोर आलेली नाही. या नंतरच्या बैठकीत उर्वरित 115 जागांवर निर्णय होणार आहे. जागावाटप निश्चित करण्यासाठी आणखी 2-3 बैठकांच्या फेऱ्या होतील. शिंदे-फडणवीस सरकारचा कार्यकाळ नोव्हेंबर 2024 मध्ये संपणार लोकसभा निवडणुकीत भाजपला केवळ 9 जागा 2019 मध्ये झालेल्या गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 105 जागा जिंकल्या होत्या. भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीमध्ये विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला 48 पैकी फक्त 9 जागा जिंकता आल्या. आघाडीचा मित्रपक्ष राष्ट्रवादीने एक जागा जिंकली. शिवसेनेने (शिंदे गट) 7 जागा जिंकल्या.

​महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील जागावाटपाबाबत महाविकास आघाडी 18 ते 20 सप्टेंबर दरम्यान मुंबईत बैठक घेणार आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी मंगळवारी (17 सप्टेंबर) ही माहिती दिली. या बैठकीत मविआमधील प्रत्येक पक्षाला किती जागा आणि कोठे मिळतील याचे सूत्र ठरवले जाईल, असे राऊत म्हणाले. जागावाटपाचा निर्णय उमेदवारांच्या विजयाच्या शक्यतेवर आधारित असेल. मविआमध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना, शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आणि काँग्रेस यांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीत 13 जागा जिंकल्यानंतर काँग्रेसचे मनोबल वाढले आहे. या कारणास्तव पक्ष अधिक जागांची मागणी करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसला महाराष्ट्रातील एकूण 288 विधानसभा जागांपैकी 110-120 जागांवर विधानसभा निवडणूक लढवायची आहे. 31 ऑगस्ट रोजी झाली महायुतीची बैठक महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीची (भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी) दुसरी फेरी 31 ऑगस्ट रोजी पार पडली. राष्ट्रवादीच्या सूत्रांनी एएनआयला सांगितले की, 3 तास चाललेल्या या बैठकीत महाराष्ट्रातील 288 पैकी 173 जागांवर सहमती झाली आहे. भाजपला जास्तीत जास्त जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाजपनंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीला जागा मिळतील. मात्र, कोणत्या पक्षाला किती जागा देण्याचे मान्य झाले, याची माहिती समोर आलेली नाही. या नंतरच्या बैठकीत उर्वरित 115 जागांवर निर्णय होणार आहे. जागावाटप निश्चित करण्यासाठी आणखी 2-3 बैठकांच्या फेऱ्या होतील. शिंदे-फडणवीस सरकारचा कार्यकाळ नोव्हेंबर 2024 मध्ये संपणार लोकसभा निवडणुकीत भाजपला केवळ 9 जागा 2019 मध्ये झालेल्या गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 105 जागा जिंकल्या होत्या. भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीमध्ये विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला 48 पैकी फक्त 9 जागा जिंकता आल्या. आघाडीचा मित्रपक्ष राष्ट्रवादीने एक जागा जिंकली. शिवसेनेने (शिंदे गट) 7 जागा जिंकल्या.  

जम्मू-काश्मीर विधानसभेच्या 24 जागांसाठी आज मतदान:पहिल्या टप्प्यात मेहबुबांची मुलगी इल्तिजासह 219 उमेदवार, 110 लक्षाधीश; 36 जणांवर फौजदारी गुन्हे

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आज 7 जिल्ह्यांतील 24 विधानसभा जागांवर मतदान होत आहे. यामध्ये 23.27 लाख मतदारांचा समावेश असेल. विविध राज्यात राहणारे 35 हजारांहून अधिक विस्थापित काश्मिरी पंडितही मतदान करू शकतील. त्यांच्यासाठी दिल्लीत 24 विशेष बूथ बनवण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यातील 24 जागांपैकी 8 जागा जम्मू विभागात आणि 16 जागा काश्मीर खोऱ्यात आहेत. जास्तीत जास्त 7 जागा अनंतनागमध्ये आणि...

कोलकाता रेप-मर्डर केस:पीडितेचे वडील म्हणाले- ममता यांनी 2021 मध्ये संदीप घोषवर कारवाई केली असती तर मुलगी जिवंत असती

कोलकात्याच्या आरजी कर मेडिकल कॉलेजमधील बलात्कार-हत्या पीडित प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या वडिलांनी ममता बॅनर्जींवर मोठा आरोप केला आहे. ते म्हणाले की, जर ममता यांनी 2021 मध्ये कॉलेजचे माजी प्राचार्य संदीप घोष यांच्यावर कारवाई केली असती तर आज माझी मुलगी जिवंत असती. पीडितेचे वडील म्हणाले- ‘सीबीआय आपले काम करत आहे, या तपासाबाबत आम्ही काहीही बोलू शकत नाही. या हत्येशी कोणकोणत्याही प्रकारे संबंध आहेत...

खासदार मालिवाल यांच्याकडे राजीनामा देण्याची ‘आप’ची मागणी:दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री आतिशीचे कुटुंब दहशतवादी अफजल गुरूचे चाहते असल्याचा केला होता आरोप

आम आदमी पक्षाने (आप) राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ‘आप’ने स्वाती मालीवाल यांना राज्यसभेवर पाठवले होते, मात्र त्या भाजपची स्क्रिप्ट वाचत असल्याचे ‘आप’चे ज्येष्ठ नेते दिलीप पांडे यांनी म्हटले आहे. त्यांना थोडीही लाज असेल तर त्यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि भाजपच्या तिकिटावर राज्यसभेचा मार्ग निवडावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. वास्तविक, मालीवाल यांनी मंगळवारी एका...

दिव्य मराठी अपडेट्स:परभणीत गणेश विसर्जन मिरवणुकीतील डीजेमुळे एकाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू

दिव्य मराठी अपडेट्स:परभणीत गणेश विसर्जन मिरवणुकीतील डीजेमुळे एकाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू

नमस्कार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देश-विदेशातील सर्वच घडामोडींचे अपडेट्स आणि विश्वासार्ह बातम्या येथे मिळतील केवळ एका क्लिकवर… मोठ्या बातम्यांपूर्वी, आजच्या ज्या महत्त्वाच्या घटनांवर आमचे लक्ष असेल त्या देखील पहा…. राज्यातील इतरही अपडेट्स पहा…. परभणीत डीजेमुळे एकाचा हृदय विकाराच्या झटक्याने गणेश भक्ताचा मृत्यू परभणी – राज्यात गणेश विसर्जन उत्साहात सुरू असताना परभणीत डीजेमुळे एकाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तसेच यामुळे आणखी दोघांची प्रकृती अतिशय गंभीर आहे. गंभीर रुग्णांना जिंतुर येथून परभणीला हलवण्यात आले आहे. परभणीच्या जिंतुर शहरात गणेश विसर्जन मिरवणूक सुरू असताना सदरील प्रकार समोर आला.

​नमस्कार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देश-विदेशातील सर्वच घडामोडींचे अपडेट्स आणि विश्वासार्ह बातम्या येथे मिळतील केवळ एका क्लिकवर… मोठ्या बातम्यांपूर्वी, आजच्या ज्या महत्त्वाच्या घटनांवर आमचे लक्ष असेल त्या देखील पहा…. राज्यातील इतरही अपडेट्स पहा…. परभणीत डीजेमुळे एकाचा हृदय विकाराच्या झटक्याने गणेश भक्ताचा मृत्यू परभणी – राज्यात गणेश विसर्जन उत्साहात सुरू असताना परभणीत डीजेमुळे एकाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तसेच यामुळे आणखी दोघांची प्रकृती अतिशय गंभीर आहे. गंभीर रुग्णांना जिंतुर येथून परभणीला हलवण्यात आले आहे. परभणीच्या जिंतुर शहरात गणेश विसर्जन मिरवणूक सुरू असताना सदरील प्रकार समोर आला.  

केरळच्या मलप्पुरममध्ये लॉकडाऊनसारखे निर्बंध:निपाह विषाणूमुळे मृत्यूनंतर 126 लोक आयसोलेट, प्रतिबंधित क्षेत्र तयार

केरळ सरकारने मंगळवारी मलप्पुरम जिल्ह्यात लॉकडाऊनसारखे निर्बंध लागू केले आहेत. निपाह व्हायरसमुळे 2 जणांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारने हे पाऊल उचलले आहे. आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले की, संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या 126 लोकांना कंटेनमेंट झोनमध्ये वेगळे करण्यात आले आहे. या वर्षी जुलैमध्ये 14 वर्षांच्या मुलाचा विषाणूमुळे मृत्यू झाला होता. 5 सप्टेंबर रोजी एका 24 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. 2018...