२६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार तहव्वूर हुसेन राणा (६४) याने एनआयए कोठडीत चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक खुलासे केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राणाने कबूल केले की तो हल्ल्याच्या वेळी मुंबईत होता आणि त्या कटाचा एक भाग होता. तो २० आणि २१ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईतील पवई परिसरातील एका हॉटेलमध्ये राहिला होता. मी पाकिस्तानी सैन्याचा विश्वासू एजंट होताे आणि लष्कर-ए-तोयबाशी सहकार्य करून डेव्हिड कोलमन हेडलीसोबत अनेक प्रशिक्षण सत्रात सहभागी झालो होतो. राणाच्या कबुलीमुळे मुंबई हल्ल्याच्या तपासाला नवी दिशा मिळू शकते. राणाने सांगितले की मुंबईत इमिग्रेशन सेंटरची स्थापना देखील त्याच्या कटाचा एक भाग होता. त्याचे आर्थिक व्यवहार व्यावसायिक खर्च म्हणून दाखवण्यात आले. राणाने छत्रपती शिवाजी टर्मिनससारख्या ठिकाणांचीही पाहणी केली. २६/११ चे हल्ले पाक गुप्तचर संस्था आयएसआयच्या इशाऱ्याने केल्याचे त्याने मान्य केले. राणाला गुप्त मोहिमेसाठी सौदीला पाठवले होते राणा म्हणाला, पाक सैन्य, गुप्तचर संस्थांचा मी विश्वासू होतो. म्हणूनच आखाती युद्धादरम्यान मला गुप्त मोहिमेवर सौदीला पाठवले होते. सैन्यातून बाहेर पडल्यानंतर तो जर्मनी, ब्रिटन आणि अमेरिकेत राहिला. नंतर तो कॅनडामध्ये स्थायिक झाला आणि तेथे मांस प्रक्रिया, रिअल इस्टेट आणि किराणा व्यवसाय सुरू केला.


By
mahahunt
8 July 2025